(फोटो सौजन्य-सोशल मीडिया) 
Entertainment

New Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत नव्या चित्रपटाची एन्ट्री! ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’च्या पोस्टरने वेधले लक्ष

New Marathi Movie: ‘अबीर’नंतर शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्सचा नवा मराठी चित्रपट ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ जाहीर झाला आहे. भाग्यश्री मोटे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार.

अमृता यादव

New Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. चित्रपटांच्या आशयासोबतच त्यांच्या हटके शीर्षकांमुळेही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहे. अशातच आता एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ असे या चित्रपटाचे नाव असून, पहिल्या पोस्टरद्वारे चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या अनोख्या शीर्षकामुळे चित्रपटाच्या कथानकाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘अबीर’नंतर शंभो एंटरटेनमेंटचा नवा चित्रपट

शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांचा ‘अबीर’नंतरचा हा दुसरा चित्रपट आहे. सुदेश वसंतराव झावरे पाटील आणि अंकिता पानसे-शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर पुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

विशेष म्हणजे, अभिनेत्री भाग्यश्री मोटे या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहणार आहेत. त्याचबरोबर त्या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेतही दिसणार आहेत. आकाश विष्णू शिंदे यांनी क्रिएटिव्ह डायरेक्टरची जबाबदारी सांभाळली आहे.

सामाजिक प्रश्नांवर विनोदी शैलीत भाष्य

‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ या चित्रपटातून सामाजिक आशयाला विनोदाची खुमासदार फोडणी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासमोरील ज्वलंत प्रश्न, त्यातून निर्माण होणारी सामाजिक परिस्थिती आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील वास्तव यांचा वेध या चित्रपटातून घेतला जाणार आहे. गंभीर विषय मांडतानाच मनोरंजनाची जोड देण्यावर चित्रपटाचा भर असणार आहे. याशिवाय चित्रपटाला गीत-संगीताचीही सुरेल साथ लाभणार आहे.

भाग्यश्री मोटेची दुहेरी भूमिका

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विविधांगी भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’च्या निमित्ताने ती अभिनयासोबतच क्रिएटिव्ह प्रोड्युसरची जबाबदारीही सांभाळणार आहे. त्यामुळे तिच्या या दुहेरी भूमिकेविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाग्यश्री मोटेसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकारांची फळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच अनुभवी तंत्रज्ञांचाही चित्रपटाच्या निर्मितीत सहभाग असणार आहे. चित्रपटातील कलाकार, कथानक आणि इतर महत्त्वाचे तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ या हटके नावाच्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता वाढली आहे.

Mumbai Ahmedabad Highway : उद्घाटनापूर्वीच उड्डाणपुलाला भेगा! कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही दर्जावर प्रश्नचिन्ह; कारवाईची मागणी

ठाकुर्ली स्थानकावर खळबळ! सिगारेट-बिडी ओढण्यास मनाई केल्याने प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर चाकूने हल्ला.

Health tips: तुमच्या घरातही येतेय का अस्वच्छ पाणी? पाणी स्वच्छ करण्यासाठी करा हे ८ सोपे उपाय!

हृदय किती निरोगी? तुमच्या हृदयाबद्दल Smartwatch मधील Heart Health Score काय सांगतो?

Prajakta Gaikwad: नऊवारी साडी, पारंपरिक दागिने अन् नखरेल अदा; प्राजक्ता गायकवाडचा लुक पाहिलात का?