Prasad Oak Announces His Upcoming Hindi Film: (सौजन्य- सोशलमीडिया)  Prasad Oak Announces His Upcoming Hindi Film: (सौजन्य- सोशलमीडिया)
Entertainment

मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर Prasad Oakची Bollywoodमध्ये झेप! हिंदी सिनेमात करणार दमदार एन्ट्री; चित्रपटाचं नाव काय?

मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक आता 'सायबर - द बिगिनिंग' या आगामी हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. राज झकेरियास निर्मित आणि आलोक नाईक दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक यांच्यासह झैन खान दुर्रानी, दर्शील सफारी, कबीर दुहान सिंग आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Riddhi Vanne
  • प्रसाद ओकची हिंदी सिनेमात एन्ट्री

  • 'सायबर - द बिगिनिंग' सिनेमाची घोषणा

  • आलोक नाईक दिग्दर्शित सिनेमात तगडी स्टारकास्ट

मराठी सिनेमात आपल्या भारी अभिनयाने आणि दिग्दर्शनाने वेगळी ओळख बनवणारे अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) आता 'सायबर - द बिगिनिंग' (Cyber The Beginning) या येणाऱ्या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. राज झकेरियास निर्मित आणि आलोक नाईक दिग्दर्शित या सिनेमाच्या (Entertainment) नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, सिनेमाबद्दलची (Prasad Oak New Film) उत्सुकता वाढली आहे.

प्रसाद ओकच्या नव्या हिंदी सिनेमाची चर्चा

गेली कित्येक वर्षं प्रसाद ओक यांनी मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 'फर्जंद', 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर', 'हिरकणी', 'स्माईल प्लीज', 'धुरळा', 'पिकासो' आणि 'धर्मवीर' सारख्या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका खास गाजल्यात. खासकरून 'धर्मवीर' सिनेमातल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

अभिनयासोबतच दिग्दर्शक म्हणून पण त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'कच्चा लिंबू' या सिनेमाला 65 व्या राष्ट्रीय सिनेमा पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'हिरकणी' आणि 'चंद्रमुखी' सारख्या सिनेमांचं पण त्यांनी दिग्दर्शन केलं.

सिनेमात कोण कोण असणार?

आलोक नाईक दिग्दर्शित 'सायबर - द बिगिनिंग' या सिनेमात प्रसाद ओक यांच्यासोबत झैन खान दुर्रानी, दर्शील सफारी, कबीर दुहान सिंग, राहुल सिंग, आलीशा खान, आयुषी त्यागी, सौम्या श्रीवास्तव, अजित कोश्य आणि विठ्ठल काळे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सिनेमामागची टीम कोणती?

राज झकेरियास यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं संगीत गोपी सुंदर यांनी दिलं, तर अनिरुद्ध चॅटर्जी यांनी लेखन केलं. अंकित त्रिवेदी आणि जितेंद्र बोरहाडे यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली असून, राहुल भाटणकर यांनी सिनेमाचं संकलन केलंय. राहुल शर्मा हे प्रॉडक्शन डिझायनर असून संजय मेनन कार्यकारी निर्माते आहेत.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे प्रसाद ओक आता 'सायबर - द बिगिनिंग' मधून एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या येणाऱ्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता प्रसाद ओक हिंदीत काय धमाल करतोय, हे बघायला सगळेच वाट बघतायत.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका