'Ramayana' Box Office Collection (सौजन्य- सोशलमीडिया) 'Ramayana' Box Office Collection (सौजन्य- सोशलमीडिया)
Entertainment

'Ramayana' Box Office Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर सर्वात खराब कामगिरी! 19 व्या दिवशी कमाईत मोठी घट; वर्ल्डवाइड कलेक्शन किती?

नितीश तिवारी दिग्दर्शित 'रामायण: पार्ट 1' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १९ दिवसांत जगभरात १,७०४.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने भारतात ९५५.२५ कोटी रुपयांचं निव्वळ कलेक्शन केलं आहे.

Riddhi Vanne
  • 'रामायण'ची १९ व्या दिवशी कमाई घसरली

  • जगभरात १,७०४ कोटींचा टप्पा पार

  • 'पुष्पा २'च्या रेकॉर्डवर 'रामायण'ची नजर

Ramayana Box Office Collection Day 19: नितीश तिवारी यांचा 'रामायण' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज नवनवीन विक्रम करत सुटला. हा सिनेमा रिलीज होऊन 19 दिवस उलटले तरी, थिएटरमध्ये त्याचं वर्चस्व अजूनही कायम आहे. रणबीर कपूर, यश, रवी दुबे आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा अवघ्या 19 दिवसांत जगभरात 1700 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडून अनेक मोठ्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडीत काढतो.

मात्र सोमवारी सिनेमाच्या कमाईत रविवार, 22 नोव्हेंबरच्या तुलनेत मोठी घट झाली असली, तरीही तो 1700 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होण्यात यशस्वी ठरला. दरम्यान, भारतात या सिनेमाचं निव्वळ कलेक्शन 955 कोटी रुपयांच्याही पुढे गेलं.

'रामायण' बॉक्स ऑफिस कलेक्शन - 19 वा दिवस

ट्रेड ट्रॅकर 'सॅकनिल्क' च्या अहवालानुसार, 'रामायण' सिनेमाने 19 व्या दिवशीही दुहेरी अंकी कमाई कायम ठेवली आहे. या सोमवारी सिनेमाने 12.70 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. यासह, भारतातल्या सिनेमाचं ग्रॉस कलेक्शन 1,141.65 कोटी रुपयांवर पोहोचलंय, तर निव्वळ कलेक्शन 955.25 कोटी रुपये इतकं झालं.

19 व्या दिवसाच्या भाषेनुसार कमाईचं विश्लेषण केल्यास, हिंदीमधून 9.25 कोटी रुपये, मल्याळममधून 1.50 कोटी रुपये, कन्नडमधून 85 लाख रुपये, तमिळमधून 80 लाख रुपये आणि तेलुगू भाषेतून 30 लाख रुपयांची कमाई झाली आहे. याआधी, 18 व्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 35.60 कोटी रुपयांची कमाई केली होती; म्हणजेच रविवारच्या तुलनेत सोमवारी कमाईत 62 टक्क्यांची घट दिसून आली.

'रामायण'चं जगभरातलं कलेक्शन

रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी अभिनीत 'रामायण: पार्ट 1' ने परदेशातल्या बॉक्स ऑफिसवर 563.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे त्याचं एकूण जागतिक संकलन 1,704.65 कोटी रुपयांवर पोहोचलंय. आता 'रामायण'ची नजर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या ब्लॉकबस्टर सिनेमाने तयार केलेल्या 1742 कोटी रुपयांच्या आकड्यावर आहे. 'रामायण: पार्ट 1' हा टप्पा गाठण्यासाठी किती वेळ घेतो, हे बघणं उत्सुकतेचं ठरेल.

बॉक्स ऑफिसवर 'रामायण'शी स्पर्धा करणारे इतर सिनेमे

गेल्या काही दिवसांपासून 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं असलं, तरी नुकताच प्रदर्शित झालेला 'ओम: ऑपरेशन मोल' हा सिनेमा सुद्धा आता चर्चेत आहे. या सिनेमात धनुष आणि ममूटी मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा पण चांगली कामगिरी करतोय. रिलीज नंतर अवघ्या तीन दिवसांतच या सिनेमाने जगभरात 93.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चौथ्या दिवसाच्या कामगिरीबद्दल सांगायचं तर, सिनेमाने पहिल्या सोमवारी 6.20 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामध्ये तमिळ भाषेतून सगळ्यात जास्त म्हणजेच 4.10 कोटी रुपये कमावले.

दुसरीकडे, हॉलिवूड सिनेमा 'गॉडझिला मायनस वन' भारतीय बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसला; प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ 33 लाख रुपयांची कमाई केली. तर मराठीत संकर्षण कऱ्हाडे आणि अशोक सराफ यांचा आदि अनंत हा सिनेमा गाजतो.

Sheikh Hasina : शेख हसीना १६ डिसेंबरला बांगलादेशात परतणार? दिल्लीतून ढाक्याला जाण्यासाठी केली सरकारी विमानाची मागणी

Bisleri Success Story : 'बिसलेरी' कसा बनला भारतातील सर्वात मोठा ब्रँड? अवघ्या 4 लाखांत खरेदी केलेली कंपनी आज अब्जावधींची; काय आहे कमाल कहाणी ?

WhatsApp Tips: खासगी चॅट्सच्या प्रायव्हसीबाबत चिंता? असे सेट करा फिंगरप्रिंट लॉक, सोपी आहे प्रोसेस

Virar Papadkhind Dam : 'पापडखिंड'ची सुरक्षा वाऱ्यावर! लोकप्रतिनिधी, आयुक्तांसमोर पाण्यात छठपूजा; धरणात दुचाकी - रिक्षा धुण्याचे प्रकार वाढले

WhatsApp Web वापरणाऱ्यांनो सावधान! अनोळखी डिव्हाइसवर लॉगिन केल्यास होऊ शकते मोठे नुकसान, गृह मंत्रालयाने दिला इशारा