हा दौरा दोन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे
अनेक शहरांपर्यंत घेऊन जाण्याची प्रेरणा मिळाली
सांस्कृतिक देवाणघेवाणीला अधिक बळकटी देईल
Toyota Drum Tao India Tour 2026 : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज जपानमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त पर्कशन समूह आणि टीकेएमचे ब्रँड अॅम्बेसेडर्स ड्रम ताओ यांच्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी १३ शहरांमध्ये झालेल्या दौऱ्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, यंदा ड्रम ताओ देशाच्या चारही विभागांतील २१ शहरांमध्ये सादरीकरण करणार आहे.
टियर-२ शहरांवर विशेष भर देत, पारंपरिक जपानी वा-डाइको ढोलवादन आणि आधुनिक रंगमंचीय सादरीकरण यांचा अनोखा संगम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या दौऱ्याचा उद्देश आहे.
पहिला टप्पा १ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२६ आणि दुसरा टप्पा ८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत. या दौऱ्याची सुरुवात नागालँड येथील हॉर्नबिल फेस्टिव्हलमध्ये होईल आणि त्यामध्ये लखनौ येथील रेपर्टवाहर कल्चरल फेस्टिव्हल तसेच पोर्ट ब्लेअर येथील आयलंड म्युझिक फेस्टिव्हल यांसारख्या संगीत आणि सांस्कृतिक महोत्सवांमधील सादरीकरणांचा समावेश असेल. त्यानंतर हा दौरा चंदीगड येथे संपन्न होईल. दौऱ्याचे वेळापत्रक आणि आयोजन स्थळांची सविस्तर माहिती टोयोटाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया चॅनेल्सवर अद्ययावत केली जाईल.
या घोषणेबाबत बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट, सेल्स, सर्व्हिस अँड युज्ड कार बिझनेस श्री. साबरी मनोहर म्हणाले, “गेल्या वर्षी भारतभरातील प्रेक्षकांकडून ड्रम ताओला मिळालेले प्रेम खरोखरच हृदयस्पर्शी होते आणि त्यातूनच आम्हाला ताल आणि संस्कृतीचा हा उत्सव आणखी अनेक शहरांपर्यंत घेऊन जाण्याची प्रेरणा मिळाली. संगीत ही एक सार्वत्रिक भाषा आहे, जी विशेषतः आजच्या युवा पिढीशी संवाद साधते. या दौऱ्याच्या माध्यमातून आम्ही आनंददायी आणि सामूहिक अनुभव निर्माण करण्याची आशा बाळगतो, जे टोयोटाच्या ‘मास हॅपिनेस फॉर ऑल’ या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.”
पारंपरिक जपानी वाद्यकला आणि आधुनिक सादरीकरणशैली यांच्या माध्यमातून ड्रम ताओचा हा दौरा भारत आणि जपानमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीला अधिक बळकटी देईल, अशी अपेक्षा आहे. कार्यक्रमाचे नियोजन लोकनियुक्त नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी केले होते. विजय जगताप यांनी प्रास्ताविक केले, तर संतोष नलावडे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. बाळासाहेब साळुंखे यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. माजी नगरसेवक मुन्नाभाई काझी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला शिवसेना नेते तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, पश्चिम महाराष्ट्र शिवसेना संपर्कप्रमुख हणमंतराव जगदाळे, जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, युवा सेना जिल्हाप्रमुख संभाजी पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेश्मा ताई जगताप, विद्याताई बर्गे, उद्योजक दयानंद भोसले यांच्यासह शिवसैनिक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.