Anti Aging Serum: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचा वयस्कर दिसते? मग 'या' पद्धतीने करा ग्लिसरीनचा वापर  
लाइफ स्टाइल

Anti Aging Serum: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचा वयस्कर दिसते? मग 'या' पद्धतीने करा ग्लिसरीनचा वापर

Anti Aging Serum: चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि ऍक्ने घालवण्यासाठी ग्लिसरीन आणि तांदळाच्या पाण्याचा वापर करून क्रिमी बनवावी. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते.

सुरुची कदम
  • चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची कारणे?

  • ग्लिसरीन तयार करण्याची कृती?

  • तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी कशा पद्धतीने करावा?

Skin Care Tips: सर्वच महिला चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स, ऍक्ने, सुरकुत्या, बारीक रेषा घालवण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी बाजारातील महागड्या क्रीमचा वापर केला जातो तर कधी सीरम, फेसपॅक, फेस मास्क वापरून त्वचेची काळजी घेतली जाते. चेहऱ्यावर आलेले डाग आणि पिंपल्स काही केल्या जात नसतील तर स्किन ट्रीटमेंट करून त्वचेवर आलेले पिंपल्स घालवण्याचा प्रयत्न केला जातो. तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागल्यानंतर चिंता वाढते आणि तणाव वाढून त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. धूळ, ऊन, प्रदुषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो.

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडण्यासोबतच चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या सुद्धा दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. यामुळे त्वचा खूप जास्त चमकदार होते आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत होते. ग्लिसरीनच्या वापरामुळे त्वचा मऊ होण्यासोबतच चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होतात. रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर ग्लिसरीन लावल्यास त्वचेच्या पेशी सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया ग्लिसरीन लावण्याची पद्धत.

त्वचेवरच्या बारीक सुरकुत्या घालवण्यासाठी उपाय:

ग्लिसरीनचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. ग्लिसरीनमध्ये असलेले घटक चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्स, ऍक्ने कमी होऊन त्वचेची गुणवत्ता सुधारते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडल्यास ग्लिसरीनचा वापर केल्यास त्वचा मॉईश्चराईज आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्यामुळे बाजारातील विकतचे ग्लिसरीन वापरण्याऐवजी घरी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ग्लिसरीन तयार करू शकता. यामुळे त्वचा थंड राहते आणि हायड्रेट राहण्यास मदत होते.

ग्लिसरीन तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये ॲलोव्हेरा जेल घेऊन फेटून घ्या. त्यानंतर तांदळाचे पाणी मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात ग्लिसरीन घालून क्रिमी मिश्रण होईपर्यंत मिक्स करा. तयार केलेली क्रिमी काचेच्या डबीमध्ये भरून ठेवा. तयार केलेली क्रीम रोज रात्री झोपण्याआधी त्वचेवर लावल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास सुरुवात होते. तांदळाच्या पाण्यात असलेले गुणकारी घटक चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी करण्यास मदत करतात आणि त्वचा आतून उजळदार करतात.

भाजप आमदाराच्या ताफ्यातील वाहनांना भरधाव स्कॉर्पिओची धडक; गाडी झाली पलटी

भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार; भारत शत्रूचे ड्रोन हवेतच नष्ट करणार

JEE NEET Update: कोचिंग क्लासेसना बसणार चाप! पुन्हा एकदा १२ वीच्या मार्क्सवर ठरणार विद्यार्थ्यांची रँक?

मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर Prasad Oakची Bollywoodमध्ये झेप! हिंदी सिनेमात करणार दमदार एन्ट्री; चित्रपटाचं नाव काय?

Jio चा धमाका! कंपनीने लाँच केली Happy New Year Offer... अनलिमिटेड 4G आणि 5G डेटासह मिळणार धमाकेदार फायदे