Amla Thecha: रोगप्रतिकारशक्ती वाढवणासाठी आयुर्वेदिक उपाय! घरच्या घरी बनवा वर्षभर टिकणारा झणझणीत आवळ्याचा ठेचा 
लाइफ स्टाइल

Amla Thecha: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय! घरच्या घरी बनवा वर्षभर टिकणारा झणझणीत आवळ्याचा ठेचा

Amla Thecha: दैनंदिन आहारात आवळ्याचा समावेश करावा. आवळा खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते, पचनक्रिया सुधारते इत्यादी अनेक फायदे शरीराला होतात. चला तर जाणून घेऊया आवळ्याचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.

सुरुची कदम

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध असतात. आवळा शरीरासाठी सुपरफूड मानला जातो. त्यामुळे दैनंदिन आहारात आवळ्याचे आवर्जून सेवन करावे. यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्य कायमच हेल्दी राहते. आवळ्यापासून लोणचे, कॅन्डी, मुरंबा किंवा ज्यूस इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण तुम्ही कधी आवळ्याचा ठेचा खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर या पद्धतीने बनवलेला आवळ्याचा ठेचा नक्कीच बनवून पहा. आवळ्यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. नियमित एक आवळा खाल्ल्यास केसांच्या समस्यांपासून सुटका मिळेल आणि केस मजबूत होतील. जेवणाच्या ताटात जर भाजी नसेल तर तुम्ही झटपट आवळ्याचा ठेचा बनवू शकता. या पद्धतीने बनवलेला आवळ्याचा ठेचा दोन ते तीन आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया आवळ्याचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – AI)

साहित्य:

  • आवळा

  • हिरवी मिरची

  • बडीशेप

  • मीठ

  • पिवळी मोहरी

  • मेथी दाणे

  • जिरं

  • काळीमिरी

  • ओवा

  • मोहरीचे तेल

  • कलोंजी

  • काळं मीठ

  • हळद पावडर

  • काश्मिरी लाल तिखट

  • व्हिनेगर

कृती:

  • आवळ्याचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आवळ्याच्या बिया काढून बारीक तुकडे करा.

  • मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचे तुकडे, आल्याचे तुकडे आणि हिरवी मिरची घालून जाडसर वाटून घ्या.

  • पॅन गरम करून त्यात बडीशेप, पिवळी मोहरी, मेथी दाणे, जिरे, ओवा आणि काळी मिरी हलकीशी भाजून थंड करण्यासाठी ठेवा.

  • थंड झाल्यानंतर त्यात मीठ टाकून पुन्हा एकदा जाडसर वाटून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग व कलौंजी घाला आणि लालसर करा.

  • त्यानंतर त्यात आवळ्याचे मिश्रण घालून मिक्स करा.

  • आवळ्यातील ओलसरपणा कमी झाल्यानंतर गॅस बंद करून त्यात चवीनुसार मीठ, हळद, काश्मिरी लाल तिखट आणि भाजलेल्या मसाल्यांची भरड घालून मिक्स करा.

  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला झणझणीत आवळ्याचा ठेचा. हा ठेचा भाकरीसोबत मस्त लागतो.

Butterfly Pea Flower : आरोग्यासाठी फायदेशीर आहे अपराजिता फूल! जाणून घ्या ब्लू टी बनवण्याची सोपी रेसिपी आणि फायदे

Zee Marathi: 'शिवानी चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही! पूजा बिरारीची ‘येतेच मी नांदायला’, भूमिका केली स्पष्ट

Dhule Crime: राज्यात पहिल्यांदाच 'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६' नुसार गुन्हा! पहाटे दोन वाजता तक्रार अन् अवघ्या तासाभरात...

Medical Officer Recruitment 2026: डॉक्टरांसाठी मोठी संधी! CRPF मध्ये बंपर पगाराची नोकरी; थेट मुलाखतद्वारे होणार निवड

Shyam Sharanam: श्रद्धा, आणि भक्तीचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार ‘श्याम शरणम्’मधून! हिंदी-गुजरातीत होणार प्रदर्शित