सोप्या पद्धतीमध्ये बनवा सफरचंद शिरा
घरी कोणी पाहुणे आल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर रव्याचा शिरा किंवा शेवयांची खीर इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सफरचंद शिरा बनवू शकता. सफरचंद शिरा बनवण्यासाठी कमीत कमी वेळ लागतो आणि घाईगडबडीच्या वेळी तुम्ही हा शिरा बनवू शकता. सफरचंद आरोग्यसाठी अतिशय गुणकारी आहेत. सफरचंदमध्ये असलेले फायबर शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्याचे काम करतात. तसेच नियमित सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सफरचंद शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.
- सफरचंद
- तूप
- साखर
- रवा
- काजू, बदाम तुकडे
- वेलची पावडर
- दूध
- केशर
- चारोळी
कृती:
- सफरचंद शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम सफरचंद स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक तुकडे करून घ्या.
- कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात सफरचंदाचे बारीक तुकडे टाकून मिक्स करा.
- नंतर त्यात साखर आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून घ्या. साखर व्यवस्थित वितळेपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवा.
- अशापद्धतीने सफरचंद सिरप तयार झाल्यानंतर काढून घ्या.
- कढईमध्ये पुन्हा एकदा तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात रवा भाजण्यासाठी टाका.
- रवा भाजून झाल्यानंतर त्यात गरम दूध घालून शिरा शिजण्यासाठी ठेवा.
- नंतर त्यात सफरचंद सिरप टाकून मिक्स करा. नंतर त्यात काजू,बदामाचे तुकडे टाकून मिक्स करून घ्या.
- अशा पद्धतीने तयार आहे सफरचंदाचा शिरा.