सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीट पराठा  
लाइफ स्टाइल

गुलाबी पदार्थ पाहून मुलं होतील खुश! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीट पराठा, नोट करा रेसिपी

Beetroot Paratha: सकाळच्या नाश्त्यात मुलं कायमच नवनवीन पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. अशावेळी मुलांना हेल्दी टेस्टी बीट पराठा खाण्यास द्यावा. यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.

सुरुची कदम

Beetroot Paratha: लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत कायमच चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. घरातील तेच ठराविक पदार्थ खाऊन मुलांना कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर विकतचे पदार्थ मागितले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे मुलांच्या शरीराची वाढ थांबते आणि शरीरात चरबीचा अनावश्यक घेर तयार होतो. त्यामुळे आहारात किंवा सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचा समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीट पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला बीट पराठा घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागते. चला तर जाणून घेऊया बीट पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • बीट

  • गव्हाचं पीठ

  • आलं लसूण मिरची पेस्ट

  • जिऱ्याची पावडर

  • ओवा

  • हळद

  • मीठ

  • कोथिंबीर

  • तूप

  • पाणी

कृती:

  • बीट पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बीटचे तुकडे घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नये.

  • मोठ्या ताटात गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, बीटची पेस्ट, आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.

  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर, ओवा, हळद घाला आणि मिक्स करून घ्या.

  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर गोळा तयार करा.

  • तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे पराठे लाटून गरम तव्यावर दोन्ही बाजूने भाजा आणि बाजूने तूप सोडून कुरकुरीत करा.

  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बीट पराठा. हा पदार्थ दह्यासोबत किंवा चटणीसोबत मस्त लागतो.

डी-लिमिटेशनमुळे अनेक संधी, मतदारसंघांची संख्याही वाढणार : राधाकृष्ण विखे पाटील

Health Update: मधुमेह, उच्च रक्तदाबाचे निदान होते, उपचारांचे काय? एनसीडी तपासणीत लाखो रुग्ण आढळले

Ramayana GTA Style Game: ‘रामायण’चा आता गेमिंग विश्वातही डंका! GTA स्टाइल गेमसह थीम पार्क आणि म्युझियम उभारणार

BSNL ने सादर केला 51 रुपयांचा नवीन प्लॅन! 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार 2GB डेटा, केवळ 'या' यूजर्सना मिळणार फायदा

Navi Mumbai News: नवी मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर; महापालिकेच्या कारभारावर टीका