डोरा केक हा जपानी प्रसिद्ध स्वीट डिश आहे जी दोन मऊ पॅनकेकसारख्या थरांमध्ये मधोमध स्वादिष्ट फिलिंग घालून तयार केली जाते. पारंपरिक डोरा केकमध्ये रेड बीन्स पेस्ट वापरली जाते, पण आज आपण मुलांना आणि मोठ्यांनाही आवडेल असा चॉकलेट डोरा केक बनवणार आहोत. मऊ, गोड आणि चॉकलेटी स्वाद असलेला हा केक नाश्त्यासाठी, स्नॅक्ससाठी किंवा पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे.
कार्टून लव्हर्स असाल तर डोरेमॉन हे कार्टून तुम्ही लहानपणी नक्कीच पाहिलं असेल यात त्याला डोरा केक खाताना अनेकांनी पाहिलं आहे. ही डिश दिसायला इतकी सुंदर आहे की पाहता क्षणी त्याला खायची इच्छा मनात येऊ लागते आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी या डोरा केकची एक स्वादिष्ट आणि गोड अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
- मैदा – १ कप
- कोको पावडर – २ टेबलस्पून
- बेकिंग पावडर – १ टीस्पून
- अंडी – २
- साखर – ½ कप
- दूध – ½ कप
- मध – १ टेबलस्पून
- व्हॅनिला इसेन्स – ½ टीस्पून
- बटर (विघळलेले) – १ टेबलस्पून
- चॉकलेट गॅनाश किंवा नुटेला – आवश्यकतेनुसार
- चॉकलेट डोरा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात अंडी आणि साखर एकत्र करून हलक्या हाताने फेसून घ्या. त्यात मध आणि व्हॅनिला इसेन्स घालून चांगले मिक्स करा.
- दुसऱ्या भांड्यात मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर चाळून घ्या. हे मिश्रण अंड्याच्या मिश्रणात घाला.
- थोडे थोडे दूध आणि विघळलेले बटर घालून गुळगुळीत आणि थोडे घट्ट असे बॅटर तयार करा.
- नॉन-स्टिक पॅन मंद आचेवर गरम करून त्यावर हलका तेलाचा लेप लावा.
- एक चमचा बॅटर पॅनवर ओता आणि गोलसर पॅनकेकप्रमाणे पसरू द्या. याला चमच्याने पसरू नका तर तसेच बॅटर पॅनवर ओतून सोडून द्या.
- याला दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा.
- एक पॅनकेक घ्या, त्यावर नुटेला किंवा चॉकलेट गॅनाश लावा आणि त्यावर दुसरा पॅनकेक ठेवून सॅंडविचसारखे तयार करा.
- गरमागरम किंवा थंड करून याला प्लेटमध्ये खण्यसाठी सर्व्ह करा.
- हा चॉकलेट डोरा केक मुलांच्या टिफिनमध्ये, वाढदिवसाच्या पार्टीत किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एक चांगला पर्याय ठरेल.
FAQs (संबंधित प्रश्न)
डोरा केकचा इतिहास काय आहे?
याचा शोध १९१४ मध्ये टोकियोच्या उएनो जिल्ह्यातील उसागिया यांनी केला होता.
चॉकलेट डोरा केकची चव कशी लागते?
मऊ पॅनकेकच्या मध्ये भरलेली चॉकलेटची फिलिंग चवीला फार अप्रतिम लागते.