Biscuit pudding(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)  
लाइफ स्टाइल

Biscuit pudding: ओव्हनशिवाय घरच्या घरी बनवा चॉकलेट बिस्किट पुडिंग, चवीला लागेल एकदम भन्नाट!

Biscuit pudding: गोड पदार्थ खाण्याची आवड असेल, तर चॉकलेट बिस्किट पुडिंगची ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा. बिस्किटे, दूध आणि चॉकलेट क्रीमच्या मदतीने ओव्हनशिवाय घरच्या घरी स्वादिष्ट डेझर्ट तयार करता येते. जाणून घ्या चॉकलेट बिस्किट पुडिंग बनवण्याची सोपी कृती आणि त्यासाठी लागणारे साहित्य.

siddhi berde

गोड पदार्थ खायला आवडणाऱ्यांसाठी चॉकलेट बिस्किट पुडिंग हा एक उत्तम पर्याय आहे. कुरकुरीत बिस्कीट आणि क्रीमी चॉकलेट असलेले हे चॉकलेट बिस्किट पुडिंग हे तुम्हाला नक्कीच आवडेल. हल्ली अनेकांना घरच्या घरी वेगवेगळे डेझर्ट बनवण्याची आवड असते. मात्र, काही पदार्थ बनवण्यासाठी ओव्हन किंवा महागड्या साहित्याची गरज असते. अशावेळी बिस्किट पुडिंग ही सोपी आणि कमी खर्चातील रेसिपी नक्की करून पाहता येईल. विशेष म्हणजे हे पुडिंग बनवण्यासाठी ओव्हनची आवश्यकता नाही. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या बिस्किटांचा आणि दुधाचा वापर करून तुम्ही हे चविष्ट डेझर्ट तयार करू शकता.या मध्ये कोणते बिस्कीट वापरायचे हे तुमच्या वर आहे.

बिस्किट पुडिंग बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया.

बिस्किट पुडिंग तयार करण्यासाठी दोन पॅकेट पार्ले-जी किंवा मेरी बिस्किटे, दोन कप दूध, तीन चमचे साखर, दोन चमचे कोको पावडर, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, एक चमचा बटर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, चॉकलेट चिप्स आणि सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स घ्या.

बिस्किट पुडिंग बनवण्याची सोपी कृती समजून घ्या.

सर्वप्रथम एका भांड्यात दूध घ्या. त्यामध्ये साखर, कोको पावडर आणि कॉर्नफ्लोअर घालून व्यवस्थित एकजीव करा. आता हे मिश्रण मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. मिश्रण सतत ढवळत राहा. काही वेळाने ते घट्ट होण्यास सुरुवात होईल. मिश्रणाला क्रीमसारखा घट्टपणा आल्यावर त्यामध्ये बटर आणि व्हॅनिला इसेन्स घाला. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

आता एका काचेच्या भांड्यात बिस्किटांचा थर लावा. त्यावर तयार केलेल्या चॉकलेट क्रीमचा थर पसरवा. पुन्हा बिस्किटांचा थर आणि त्यावर चॉकलेट क्रीम अशा पद्धतीने संपूर्ण भांडे भरा. असे किमान चार वेळा करा. त्यामुळे चॉकलेट लेअर पुडिंग तयार होईल. चिप्स, किसलेले चॉकलेट किंवा बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून सजवा.

फ्रिजमध्ये ठेवा आणि थंडगार सर्व्ह करा.

पुडिंग तयार झाल्यानंतर ते किमान चार ते पाच तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर त्याचे छोटे तुकडे करून सर्व्ह करा. बिस्किटांचे मऊसर थर आणि चॉकलेट क्रीमची चव यामुळे हा पदार्थ अधिक स्वादिष्ट लागतो. विकेंडला मुलांसाठी, पाहुण्यांसाठी किंवा घरी काहीतरी गोड बनवण्याची इच्छा झाल्यास ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा. कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे डेझर्ट लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकते.

Top 5 Stocks Weekly Return : लाल रंगात बाजार असतानाही हे 5 शेअर्स सुसाट! एकाच आठवड्यात तब्बल 69% पर्यंत रिटर्न; नंबर 1 वर कोण?

CAT 2026 : मुलांनो लक्ष द्या! कॅट परीक्षेच्या नियमांत झाले 'हे' मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर..

Kho Kho Championship : खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धा : धाराशिव, पुणे, ठाणे, मुंबईसह यजमान अहिल्यानगरचे संघ बाद फेरीत

Rohit Pawar Letter : 'या निर्णयामुळे शरद पवारांच्या आयुष्यभराच्या तपाचा भंग...' रोहित पवारांचे खासदार सुप्रिया सुळेंना पत्र

1:1 Bonus Share Record Date : वाह...! 'या' शेअरवर मिळणार 1 वर 1 Bonus! आधीच दिलाय Dividend; रेकॉर्ड डेट चुकवू नका