Planning a trip this winter? Then be sure to try out these 7 fantastic travel activities! (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)  Planning a trip this winter? Then be sure to try out these 7 fantastic travel activities! (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लाइफ स्टाइल

Travel: हिवाळ्यात फिरायला जाताय? मग नक्की करून पाहा 'या' ७ भन्नाट ट्रॅव्हलिंग अ‍ॅक्टिव्हिटीज!

travel: हिवाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? ट्रेकिंग, कॅम्पिंग, स्नो अ‍ॅक्टिव्हिटीज, वाइल्डलाइफ सफारी, फोटोग्राफी आणि पॅराग्लायडिंग अशा ७ खास अ‍ॅक्टिव्हिटीज जाणून घ्या आणि तुमची हिवाळी सहल बनवा अधिक रोमांचक व संस्मरणीय.

siddhi
  • हिवाळ्यात ट्रेकिंग, कॅम्पिंग, स्नो अ‍ॅक्टिव्हिटीज आणि वाइल्डलाइफ सफारी करून सहलीचा आनंद द्विगुणित करता येतो.

  • सनराइज पॉइंटला भेट देणे, फोटोग्राफी करणे आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे यामुळे प्रवास अधिक संस्मरणीय बनतो.

  • सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगसारख्या रोमांचक अ‍ॅक्टिव्हिटीज करताना हवामान, योग्य साधने आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी.

हिवाळा हा फिरण्यासाठी आणि नवीन ठिकाणे एक्सप्लोर करण्यासाठी उत्तम ऋतू मानला जातो. प्रत्येक व्यक्ती स्वतःला आवडेल अशा ठिकाणी फिरायला जाते त्यामध्ये काही जणांना डोंगरावर फिरायला आवडते तर काहींना समुद्रकिनाऱ्या वर भटकायला आवडते. पण प्रत्येक ठिकाणी करता येतील अशा विविध कृती असतात. ज्याने तुमच्या सहलीला अजून मजा येते. थंडगार हवामान, धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवीगार निसर्गरम्य ठिकाणे आणि आल्हाददायक वातावरण यामुळे हिवाळी पर्यटनाचा आनंद काही वेगळाच असतो. या काळात केवळ पर्यटनस्थळांना भेट देण्याऐवजी वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज करून प्रवास अधिक रोमांचक बनवता येतो. तुम्हीही हिवाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या सात खास अ‍ॅक्टिव्हिटीज नक्की करून पाहा.

१. ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंद घ्या.

काही जणांना ट्रेकिंग ला जाण्यात विशेष आनंद वाटतो, त्यात हिवाळ्यामध्ये गडावर सकाळी धुके पडलेले असते.त्यामुळे सुंदर अशी दृश्य पाहायला मिळतात. हिवाळ्यात ट्रेकिंग करण्यासाठी वातावरण तुलनेने आल्हाददायक असते. सह्याद्रीतील डोंगररांगा, किल्ले आणि निसर्गरम्य वाटांवर ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो. राजगड, हरिश्चंद्रगड आणि लोहगड यांसारख्या ठिकाणी ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासोबतच शारीरिक हालचालही होते.

२. कॅम्पिंग आणि बोनफायर असलेले ठिकाण निवडा.

काही व्यक्तींना रात्रीच्या ऍक्टिव्हिटीस मध्ये रस जास्त असतो त्यात कॅम्पिंग देखील तुम्ही करू शकता.त्याचबरोबर थंड रात्री तुम्ही कॅम्पिंग चा आनंद घेऊ शकता, थंडगार वातावरणात मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबीयांसोबत कॅम्पिंग करण्याची मजा काही वेगळीच असते. रात्री तंबूमध्ये राहणे, आकाशातील तारे पाहणे आणि शेकोटीभोवती गप्पा मारणे,गाणी म्हणणे हा अनुभव अविस्मरणीय ठरू शकतो. कॅम्पिंगसाठी सुरक्षित आणि अधिकृत ठिकाणाची निवड करावी.

३. स्नो अ‍ॅक्टिव्हिटीजचा अनुभव घ्या.

बर्फवृष्टी होणाऱ्या ठिकाणी फिरायला जात असाल तर स्नोमॅन बनवणे, बर्फात खेळणे आणि स्कीइंग यांसारख्या अ‍ॅक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो. गुलमर्ग, मनाली आणि औली ही यासाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत.तिकडे तुम्ही बर्फाचा अधिक आनंद घेऊ शकता. बर्फातील खेळांसाठी योग्य कपडे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी. तसेच योग्य साधनांचा वापर करावा.

४.वाइल्डलाइफ सफारी करा.

हिवाळ्यात वन्यजीव निरीक्षणासाठी अभयारण्यांना भेट देता येते.त्याचबरोबर तुम्हाला जंगल सफारी करायची असेल तर जंगल सफारीचा काळ हा उत्तम आहे. जंगल सफारीदरम्यान विविध पक्षी, प्राणी आणि निसर्ग जवळून अनुभवता येतो. ताडोबा, पेंच आणि रणथंबोर यांसारखी ठिकाणे सफारीसाठी प्रसिद्ध आहेत. सफारीदरम्यान वन्यजीवांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

५. फोटोग्राफी आणि सनराइज पॉइंटला भेट देणे.

हिवाळ्यातील धुके, डोंगरांमधून उगवणारा सूर्य आणि निसर्गाचे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासारखे असते. त्यामुळे सकाळी लवकर उठून सनराइज पॉइंटला भेट द्या. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी ही खास अ‍ॅक्टिव्हिटी ठरू शकते.

६. स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या.

प्रवासादरम्यान त्या ठिकाणचे पारंपरिक खाद्यपदार्थ चाखायला विसरू नका. गरमागरम चहा, कॉफी, सूप आणि स्थानिक हिवाळी पदार्थांचा आस्वाद घ्या. यामुळे त्या ठिकाणची खाद्यसंस्कृती जाणून घेण्याची संधी मि

७. सायकलिंग आणि पॅराग्लायडिंग

निसर्गरम्य रस्त्यांवर सायकलिंग करणे किंवा सुरक्षित हवामानात प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पॅराग्लायडिंग करणे हा प्रवासातील रोमांचक अनुभव ठरू शकतो. मात्र, यासाठी अधिकृत आणि सुरक्षित अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरची निवड करणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी तुम्ही सहलीला जाताना ह्या ऍक्टिव्हिटी बद्दल अभ्यास करून जा.

हिवाळ्यातील प्रवास अधिक संस्मरणीय करण्यासाठी या अ‍ॅक्टिव्हिटीज नक्की करून पाहा. प्रवासाचे नियोजन करताना हवामान, योग्य कपडे, आरोग्य आणि सुरक्षितता यांना प्राधान्य द्या. योग्य नियोजन केल्यास तुमची हिवाळी ट्रिप अधिक आनंददायी आणि अविस्मरणीय होऊ शकते

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक