थायरॉईड झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे 
लाइफ स्टाइल

वयाच्या चाळीशीमध्ये प्रार्थना बेहेर गंभीर आजाराने त्रस्त! त्वचेमध्ये बदल झाल्यास वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय शरीरात थायरॉईडची लक्षणे दिसू लागल्यास आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे योग्य वेळी उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.

सुरुची कदम

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राथर्ना बेहेरेने तिच्या अभिनयाने चात्यांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. तिने मराठी मालिका, चित्रपटांसोबत हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. प्रार्थनाने वयाच्या १६ व्या वर्षांपासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय तिने पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये मोठी प्रसिद्धी मिळावी आहे. नुकतेच तिने तिला झालेल्या गंभीर आजाराबद्दल माहिती दिली आहे. प्रार्थनाला वयाच्या चाळीशीमध्ये थायरॉईड झाल्याची महिती दिली आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात थायरॉईड झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

बिघडलेली जीवनशैली, मानसिक तणाव, कामाचा वाढलेला तणाव, चुकीचा आहार, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. महिलांमध्ये प्रामुख्याने थायरॉईडची लक्षणे दिसून येतात.थायरॉईड झाल्यानंतर शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे वयाच्या चाळिशीनंतर महिलांची स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्यपेक्षा जास्त किंवा कमी झाल्यानंतर थायरॉईड होण्याची शक्यता असते. आज आम्ही थायरॉईड झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

थायरॉईड झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे:

  • जास्त घाम येणे
  • थकवा अशक्तपणा जाणवणे
  • नीट झोप न लागणे
  • अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे
  • अनियमित मासिक पाळी
  • मासिक पाळी येण्यास विलंब होणे

धण्याचे पाणी:

थायरॉईड झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम दिसून येतो. यामुळे त्वचा कोरडी होणे, त्वचा निस्तेज होणे, अचानक केस गळती होण्यास सुरुवात होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शरीरात होणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. थायरॉईड झाल्यानंतर धण्याचे पाणी प्यावे. रिकाम्या पोटी धण्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे आरोग्य सुधारते. धणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत.

कोमट दुधात खोबऱ्याचे तेल टाकून प्यावे:

मागील अनेक वर्षांपासून आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जात आहे. खोबऱ्याचे तेल आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. एक ग्लास कोमट दूध घेऊन त्यात एक चमचा खोबऱ्याचे तेल टाकून मिक्स करून प्यावे. यामुळे थायरॉईड नियंत्रणात राहील आणि शरीराला अनेक फायदे होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्याहे सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!

LinkedIn Study Entrepreneurship : स्टार्टअप आणि बिझनेसचा क्रेझ! 85% व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय; लिंक्डइनचा सर्वे काय सांगतो?

भातकापणीत मग्न सासू-सुनेवर काळाचा घाला; त्याच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, सून जखमी...

वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी