Minimalist jewellery(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)  
लाइफ स्टाइल

Minimalist jewellery: मिनिमलिस्ट ज्वेलरीचा वाढतोय ट्रेंड! नाजूक दागिन्यांमध्ये मिळवा आकर्षक आणि सुंदर लुक

Minimalist jewellery: ऑफिस, कॉलेज आणि रोजच्या वापरासाठी सध्या मिनिमलिस्ट ज्वेलरीचा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. नाजूक नेकलेस, हलके कानातले, डेलिकेट रिंग्स, ब्रेसलेट, पर्ल आणि सिल्व्हर ज्वेलरीमुळे कमी दागिन्यांमध्येही आकर्षक, आधुनिक आणि एलिगंट लुक मिळवता येतो.

siddhi berde
  • नाजूक नेकलेस, छोटे हूप्स आणि डेलिकेट रिंग्समुळे साध्या कपड्यांनाही स्टायलिश लुक मिळतो.

  • गोल्ड, सिल्व्हर आणि पर्ल मिनिमलिस्ट ज्वेलरी ऑफिस, कॉलेज, पार्टी आणि रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहेत.

  • नाजूक मंगळसूत्र, बुगडी, नथनी आणि पैंजण यांचाही मिनिमलिस्ट ज्वेलरीमध्ये समावेश करून पारंपरिक आणि आधुनिक लुक खुलवता येतो.

आजच्या फॅशनविश्वात कमी आणि नाजूक दागिन्यांमध्ये आकर्षक दिसण्याचा ट्रेंड लोकप्रिय होत आहे.आजकाल ऑफिस ला जाणाऱ्या स्त्रियांना जड दागिने घालणे आवडत नाही. मोठे, जड आणि भरजरी दागिने घालण्याऐवजी नाजूक, साधे आणि सुंदर डिझाइन असलेल्या दागिन्यांना तरुणींकडून पसंती मिळत आहे. या ट्रेंडला मिनिमलिस्ट ज्वेलरी (Minimalist Jewellery) असे म्हणतात.त्यामध्ये नाजूक दिसणारे नेकलेस तसेच मंगलसूत्र अश्या दागिन्यांचा समावेश होतो. ऑफिस, कॉलेज, पार्टी किंवा रोजच्या वापरासाठी हे दागिने उत्तम पर्याय ठरत आहेत. विशेष म्हणजे पारंपरिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर हे दागिने सहज खुलून दिसतात.त्यामुळे स्त्रियांना वापरायला देखील ते आरामदायी वाटतात

१. मिनिमलिस्ट नेकलेस

पातळ गोल्ड चेन, छोटासा पेंडंट, हार्ट शेप, स्टार आणि सर्कल डिझाइनच्या नेकलेसला विशेष पसंती मिळते.हे दागिने तुम्हाला बाजारात कोणत्याही ठिकाणी सापडतील. हे नेकलेस शर्ट, कुर्ती, टॉप आणि ड्रेसवर सुंदर दिसतात. दोन ते तीन पातळ चेन एकत्र घालून लेयर्ड लुकही तयार करता येतो.हा लेयर्ड लुक रोज साठी देखील तुम्ही कॅरी करू शकता

२. मिनिमलिस्ट इअररिंग्स

लहान गोल्ड स्टड्स, छोटे हूप्स, पर्ल स्टड्स आणि जिओमेट्रिक डिझाइनचे कानातले या प्रकारात येतात.सोन्यामध्ये देखील तुम्ही बनवून वापरू शकता.वजनाने हलके असल्यामुळे दिवसभर वापरण्यासाठी हे कानातले आरामदायी ठरतात. साध्या कपड्यांनाही यामुळे आकर्षक लुक मिळतो.

३. डेलिकेट रिंग्स

बारीक गोल्ड रिंग्स, सिंगल स्टोन रिंग्स, ओपन बँड आणि हार्ट शेप रिंग्स सध्या लोकप्रिय आहेत.त्याच बरोबर लेयर्डरिंग्स सुधा सोशल मीडिया वर प्रसिद्ध होत आहेत, एकाच बोटात किंवा वेगवेगळ्या बोटांमध्ये दोन ते तीन रिंग्स घालून स्टायलिश लुक मिळवता येतो.त्याच सिंगल बँड वापरणं पसंत करतात.

४. मिनिमलिस्ट ब्रेसलेट

पातळ चेन ब्रेसलेट, छोट्या चार्म्सचे ब्रेसलेट आणि साधे कफ ब्रेसलेट हातांचे सौंदर्य वाढवतात. घड्याळासोबतही हे ब्रेसलेट छान दिसतात. घड्याळासोबत हे ब्रेसलेट अजूनच सुंदर दिसते.ऑफिसवेअर आणि कॅज्युअल लुकसाठी हा चांगला पर्याय आहे.ह्या ब्रेसलेट मध्ये नाजूक कड्यासारखे दिसणारे ब्रेसलेट देखील तुम्ही वापरू शकता

५. सिल्व्हर मिनिमलिस्ट ज्वेलरी

गोल्ड ज्वेलरीसोबतच सिल्व्हर मिनिमलिस्ट दागिन्यांनाही पसंती मिळत आहे. पातळ चेन, छोटे हूप्स, साध्या रिंग्स आणि सिल्व्हर ब्रेसलेट यांचा वापर जीन्स, टॉप, कुर्ती आणि फॉर्मल कपड्यांसोबत करता येतो.चांदीचे दागिने आवडणाऱ्या व्यक्तींसाठी चांदीचे मिनिमलिस्ट हे अजूनच सुंदर दिसतील.

६. पर्ल मिनिमलिस्ट ज्वेलरी

छोटे मोती असलेले नेकलेस, पर्ल स्टड्स आणि नाजूक ब्रेसलेट यामुळे लुकला क्लासी टच मिळतो.त्याचबरोबर हूप पर्ल हे देखील सुंदर दिसतात. विशेषतः पार्टी, डिनर आणि छोट्या कार्येक्रमांसाठी हे दागिने आकर्षक दिसतात.

मिनिमलिस्ट ज्वेलरी निवडताना आपल्या कपड्यांचा रंग, प्रसंग आणि वैयक्तिक आवड लक्षात घ्यावी.त्यासोबत तुम्ही कोणत्या प्रकारातले कपडे घालणार आहेर्त त्यावर कोणते दागिने जातील हे तपासून पहा. तसेच नाजूक मंगळसूत्र चा देखील तुम्हाला या दागिन्यांमध्ये समावेश करता येईल. रोजच्या वापरासाठी हलके आणि आरामदायी दागिने निवडावेत. तसेच दागिन्यांची चमक टिकवण्यासाठी त्यांना परफ्यूम, पाणी आणि ओलाव्यापासून दूर ठेवावे. कमी दागिन्यांमध्येही आकर्षक, आधुनिक आणि एलिगंट लुक मिळवण्यासाठी मिनिमलिस्ट ज्वेलरी हा उत्तम पर्याय ठरत आहे.ह्या दागिन्यांमध्ये जोडावी, बुगडी,नथनी,पैंजण असे सुद्धा दागिने तुम्हाला बघायला मिळतील.

बेकायदेशीरपणे भारतात राहणे बांगलादेशी तरूणाला चांगलेच महागात पडले; कोर्टाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

लग्नाच्या १३ वर्षांनंतर अर्जुन बिजलानी पुन्हा चढणार बोहल्यावर! पत्नी नेहासोबत अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका व्हायरल

5 Wicket Haul: आकाशदीपने दुसऱ्यांदा घेतल्या करिअरमध्ये 5 विकेट्स, झहीर-ईशांतच्या खास क्लबमध्ये सामील

Sheikh Hasina : हसीना यांच्या प्रत्यार्पणावरून भारत-बांगलादेश संबंधांत तणाव; जाणून घ्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या धमकीत किती तथ्य?

Umbrj Maruti Temple: उंब्रजचा प्रताप मारुती मंदिर कळसाशिवाय का आहे? जाणून घ्या या मंदिराचा ३७७ वर्षांचा इतिहास