कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर त्वचेवर दिसतात 'ही' गंभीर लक्षणे 
लाइफ स्टाइल

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर त्वचेवर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, त्वरित करा उपचार

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर त्वचेवर खाज येणे, त्वचा लाल होणे, चेहऱ्यावर गाठी येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतता. या समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.

सुरुची कदम

चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, अवेळी जेवणे, सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन करणे, धूम्रपान, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींचा नकारात्मक परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैली जगणे आवश्यक आहे. सतत तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी वाढू लागते, शिवाय कोलेस्ट्रॉलची पातळीमध्ये सुद्धा वाढ होते. शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच घरगुती उपाय सुद्धा करून पाहावे. घरगुती उपाय आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही.

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आणि इतर ठिकाणी पिवळा थर साचण्यास सुरुवात होते. हा पिवळा चिकट तर हृद्य आणि शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन राहतो. यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचाझटका येण्याची शक्यता असते. शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. त्यातील चांगल्या कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी गुणकारी असते, तर खराब कोलेस्टरॉलमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर त्वचेवर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर त्वचेवर दिसतात 'ही' गंभीर लक्षणे:

डोळे पिवळे होणे:

कोलेस्ट्रॉलची पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर हळूहळू डोळ्यांचा काही भाग पिवळा होऊ लागतो. डोळ्यांखाली आणि पापण्यांखाली पिवळा थर तयार होऊ लागतो. तसेच त्वचेखाली पिवळ्या रंगाची चरबी जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.

चेहऱ्यावर सूज येणे:

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर चेहऱ्याला सूज येण्यास सुरुवात होते. हळूहळू चेहरा सुजू लागतो. अशी लक्षणे दिसल्यानंतर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्त परिसंचरण पूर्णपणे विस्खलित होऊन जाते. चेहऱ्याला जास्त सूज येत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने औषध उपचार करावे.

चेहऱ्याला खाज येणे:

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर त्वचा पिवळी पडण्यासोबतच कोरडी आणि रुक्ष होऊन जाते. तसेच चेहऱ्यावर खाज येण्यास सुरुवात होते. सतत चेहऱ्याला खाज येत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. दुर्लक्ष केल्यास आणखीन खाज येऊन इतर समस्या उद्भवू शकतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर त्वचेमधील पाणी आणि ओलावा कमी होऊन जातो.

मुरूम, पिंपल्स येणे:

कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर त्वचेवर मुरूम आणि पिंपल्स येऊ लागतात. शिवाय चेहऱ्यावर लहान लहान गाठी दिसू लागतात. या गाठी वेदना विरहित असल्यामुळे अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वरील काही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!