Health news(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)  
लाइफ स्टाइल

Health news: आजारांना दूर ठेऊन आरोग्याची काळजी घेण्यासाठी फुफ्फुसांची काळजी घेणे का गरजेचे बनत आहे?

Health news: वाढते वायुप्रदूषण, धूम्रपान आणि बदलती जीवनशैली यांमुळे फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे बनले आहे. नियमित व्यायाम, प्रदूषणापासून बचाव, धूम्रपान टाळणे आणि श्वसनाशी संबंधित लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते.

siddhi berde
  • वाढते वायुप्रदूषण, धूम्रपान आणि घरातील धूर यांमुळे फुफ्फुसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

  • नियमित व्यायाम, हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे आणि तंबाखू व व्हेपिंग टाळणे या सवयी फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यास मदत करतात.

  • दीर्घकाळ खोकला, धाप लागणे, श्वास घेताना घरघर किंवा वारंवार श्वसनसंसर्ग होत असल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्या.

सर्वसाधारण व्यक्ती स्वतःच्या श्वासोच्छ्वासाचा विचार सहसा तेव्हाच करतात, जेव्हा त्यामध्ये काहीतरी बिघाड होतो. खोकला, धाप लागणे किंवा एखाद्या आजारामुळे चालण्या-फिरण्यात, व्यायामात किंवा शांत झोपेत अडथळा येईपर्यंत फुफ्फुसांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. वाढते वायू प्रदूषण, बदलते वातावरण आणि जीवनशैलीतील बदलांमुळे निर्माण होत असलेले धोके पाहता, आरोग्य दीर्घकाळपर्यंत चांगले राहावे यासाठी घेण्यासाठीच्या काळजीमध्ये श्वसनसंस्थेच्या आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे झाले आहे. आपली फुफ्फुसे अविरत कार्यरत असतात. ती रक्तात ऑक्सिजन पोहोचवतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात, ज्यावर शरीरातील प्रत्येक महत्त्वाचा अवयव अवलंबून असतो. फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाली की समस्या केवळ श्वासोच्छ्वासापुरती मर्यादित राहत नाही; तर त्याचा परिणाम ऊर्जा, तग धरण्याची क्षमता, झोप आणि एकूणच जीवनमानावर होतो.

फुफ्फुसांच्या आरोग्याकडे लक्ष देणे का गरजेचे आहे?

राजेश मिस्त्री यांनी सांगितल्याप्रमाणे, दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यांसारख्या आजारांमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता आणि व्यक्तीच्या दैनंदिन हालचालींवर मोठा मर्यादा येऊ शकतात. याशिवाय न्यूमोनिया, क्षयरोग आणि फुफ्फुसांचा कर्करोग यामुळे श्वसनविकारांचे जागतिक प्रमाण अधिकच वाढले आहे. वायू प्रदूषण ही एक मोठी चिंता आहे. हवेतील सूक्ष्म धूलिकण, वाहनांचा धूर, औद्योगिक प्रदूषके आणि बांधकामाची धूळ श्वसनमार्गात शिरतात, ज्यामुळे फुफ्फुसांना सूज येते आणि कालांतराने त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.घरातील हवेची गुणवत्ताही तितकीच महत्त्वाची आहे. हवा खेळती नसणे,स्वयंपाकातून निघणारा धूर, आणि कामाच्या ठिकाणची धूळ यांमुळे फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो. धूम्रपान आणि इतरांच्या धूम्रपानाचा धूर ही फुफ्फुसांच्या आजारांची टाळता येण्याजोगी प्रमुख कारणे आहेत. (डॉ. राजेश मिस्त्री, सिनियर डायरेक्टर (ग्रुप), ऑन्कोलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)

फुफ्फुसांचे संरक्षण करण्यासाठी दैनंदिन सवयी लावा.

फुफ्फुसांची काळजी घेण्यासाठी मोठ्या बदलांची गरज नसते. काही सातत्यपूर्ण सवयींमुळे आजारांचा धोका कमी होतो आणि एकूणच आरोग्याला हातभार लागतो.

१. हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवा - विशेषतः घराबाहेर व्यायाम करण्यापूर्वी स्थानिक एअर क्वालिटी इंडेक्स तपासा. ज्या दिवशी प्रदूषण जास्त असेल, त्या दिवशी घराबाहेरील कष्टाचे व्यायाम कमी करा आणि जास्त वर्दळीच्या किंवा वाहतूक कोंडीच्या ठिकाणी जाणे टाळा.

२. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा - नियमित व्यायामामुळे हृदय व रक्तवाहिन्यांची क्षमता वाढते आणि शरीराला ऑक्सिजनचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. चालणे, सायकलिंग आणि पोहणे यांमुळे सहनशक्ती सुधारते.

३. धूम्रपान आणि व्हेपिंग टाळा - कोणत्याही स्वरूपातील तंबाखू आणि इतरांच्या धूम्रपानाच्या धुरापासून दूर राहणे, हा फुफ्फुसांसाठी सर्वोत्तम उपाय आहे.

४. लसीकरण अद्ययावत ठेवा - श्वसनमार्गाचे संसर्ग कधीकधी गंभीर रूप धारण करू शकतात, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये.

५. दीर्घकाळ राहणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका - बराच काळ राहणारा खोकला, कोणतेही स्पष्ट कारण नसताना धाप लागणे, श्वास घेताना घरघर आवाज येणे, छातीत अस्वस्थता जाणवणे किंवा वारंवार संसर्ग होणे या लक्षणांसाठी वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे.

प्रतिबंधात्मक काळजी का महत्त्वाची आहे?

श्वसनाच्या समस्या नेहमीच लगेच दिसून येत नाहीत. फुफ्फुसांचे काही आजार हळूहळू वाढतात, म्हणूनच लवकर जागरूक राहणे आणि वेळेत वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. नियमित आरोग्य तपासणी, वैद्यकीयदृष्ट्या गरज भासल्यास फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेच्या चाचण्या करणे आणि आपण कोणत्या प्रदूषकांच्या संपर्कात येतो हे जाणून घेणे.या सर्व गोष्टी श्वसन आरोग्याबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. फुफ्फुसांच्या कर्करोगासाठी 'लो-डोस सीटी स्कॅन' यांसारख्या विशेष तपासण्या सर्वांसाठी नसून, केवळ ज्यांना या आजाराचा अधिक धोका आहे अशा पात्र व्यक्तींसाठीच सुचवल्या जातात.

संपूर्ण आयुष्यभर मोकळा श्वास घेता यावा यासाठी फुफ्फुसांच्या आरोग्याला प्राधान्य देऊया.

निरोगी फुफ्फुसे आपल्याला केवळ श्वास घेण्यास मदत करत नाहीत; तर ती आपली सहनशक्ती, दैनंदिन हालचाली, व्यायामाची क्षमता आणि एकूणच जीवनमान टिकवून ठेवतात. प्रदूषकांचा संपर्क कमी करणे, तंबाखू टाळणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि सुरुवातीची धोक्याची लक्षणे ओळखणे या सवयी फुफ्फुसांचे संरक्षण करतात.फुफ्फुसांची काळजी घेतल्याचा फायदा अनेक वर्षे मिळतो. आयुष्यभर सक्रिय, स्वावलंबी आणि निरोगी राहण्याचे स्वातंत्र्य जपणे, हाच यामागचा खरा उद्देश आहे.

मुंबईत ‘MIECA 2026’चे चौथे पर्व दिमाखात संपन्न; शिक्षण-उद्योगातील २०० मान्यवर व संस्थांचा सन्मान

'जडेजा जबरदस्त ऑलराउंडर, पण...' चार वेगवान गोलंदाजांच्या प्लॅनवर बहुतुलेंनी सांगितली Team India ची इनसाइड स्टोरी

'या' स्मार्टफोनचा लूक बदलला! 5000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि दोन नवे कलर ऑप्शन्स, काय आहे 5G फोनची किंमत?

महागड्या SUV कशाला? कमी बजेटमध्ये दमदार टर्बो इंजिन देणाऱ्या या 5 गाड्या पाहाच

डिलिमिटेशन बिलामुळे मविआमध्ये वादाची ठिणगी? शरद पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस अन् ठाकरे गट आक्रमक