संग्रहित फोटो 
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; 'या' बड्या नेत्याने दिली माहिती

तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) स्वबळावर उतरत आहे. “ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनं आणि आत्मविश्वासानं लढवणार,” असा ठाम निर्धार तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी व्यक्त केला.

ज्ञानेश्वर मोरे
  • आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी
  • तासगावमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार
  • तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

तासगाव : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांचे दौरेदेखील वाढले आहेत. तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) स्वबळावर उतरत आहे. “ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनं आणि आत्मविश्वासानं लढवणार,” असा ठाम निर्धार तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तासगावमध्ये नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित झाली असून काही वार्डांमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील (दादा), प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील (नाना), माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने रणांगणात उतरणार आहे. तासगावात राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित करून विकासाचा नवा अध्याय लिहायचा आहे, असे म्हणत पाटील यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. यावेळी शहराध्यक्ष दिनेश पवार, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

माजी मंत्री अजितराव घोरपडेंकडे धुरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्यासमोर अजितराव घोरपडे यांचे थेट आव्हान उभे राहणार का, याकडे तासगावकरांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका