Buldhana Farmers Financial Awaiting 5000 Aid  photo- Ai generated
बुलढाणा

Buldhana: मंजुरी मिळाली, पण खात्यात पैसेच नाहीत; बुलढाण्यात ५,१३७ शेतकरी मदतीपासून वंचित, अग्रिम अनुदानाच्या वाटपात तांत्रिक अडथळे

Buldhana Farmers Financial 5000 Aid Awaiting: बुलढाणा जिल्ह्यात शासनाची पाच हजार रुपयांची अग्रिम मदत मंजूर होऊनही ५ हजार १३७ शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहेत.

Priyanka Mundinkeri
  • बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांची अग्रिम मदत रखडली

  • ५,१३७ शेतकऱ्यांना अद्याप पाच हजारांची प्रतीक्षा

  • आधार-केवायसीच्या त्रुटींमुळे शेतकरी अडकले

बुलढाणा: दुष्काळाच्या झळांनी आधीच होरपळलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या अग्रिम मदतीतून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर झाल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता.

मात्र, मदतीचे वितरण सुरू होऊन मोठ्या प्रमाणात निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला असतानाही जिल्ह्यातील ५ हजार १३७ शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. कागदपत्रे, आधार संलग्नता, केवायसी आणि बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे या शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली होती. या मदतीसाठी जिल्ह्यातील ४ लाख ३० हजार २९० शेतकरी मंजूर झाले आहेत. त्यापैकी ४ लाख ३० हजार १५३ शेतकऱ्यांच्या खात्यात २१५ कोटी ७ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. मदत वितरणाचा आकडा मोठा असला, तरी मंजूर लाभाथ्यांपैकी ५ हजार १३७ शेतकऱ्यांना अद्याप प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही. त्यामुळे मदत मंजूर असूनही ती हातात न पडल्याने या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कायम आहे.

मदत वितरण प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर मंजुरी असतानाही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. काही लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी संबंधित त्रुटी आहेत, तर काहींची केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे. अनेक शेतकऱ्यांची बैंक खाती आधारशी संलग्न नसल्याने निधी हस्तांतरणात अडथळे निर्माण झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये जमिनीच्या नोंदी आणि लाभार्थ्यांच्या माहितीतील विसंगतीमुळेही मदतीचे वितरण रखडले आहे.

शासनाकडून मदत जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना ती प्रत्यक्ष मिळण्यासाठी विविध तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. मात्र, ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना या प्रक्रियेतील त्रुटी नेमक्या कोणत्या आहेत, त्या कशा दुरुस्त करायच्या आणि मदत मिळवण्यासाठी कुठे पाठपुरावा करायचा, याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्याने अडचणी वाढत आहेत.

मंजूर लाभार्थ्यांना मदत मिळण्यासाठी संबंधित त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, बैंक व आधार संलग्नतेतील अडचणी सोडविणे आणि जमिनीच्या नोंदीतील विसंगती तपासून लाभार्थ्यांना निधी वितरित करणे आवश्यक आहे. अन्यथा, शासनाकडून मदत मंजूर होऊनही प्रत्यक्ष लाभ न मिळाल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी कायम राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ५ हजार १३७ शेतकऱ्यांना अग्रिम मदत मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने त्रुटी दूर करून निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही

दुष्काळी परिस्थितीत शेतीचा खर्च, घरगुती गरजा, कर्जाचे हप्ते आणि आगामी हंगामाची तयारी अशा अनेक आर्थिक जबाबदाऱ्यांचा भार शेतकऱ्यांवर आहे. पाच हजार रुपयांची अग्रिम मदत ही रक्कम तुलनेने कमी असली, तरी संकटाच्या काळात ती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधार ठरणार होती. दिवाळीपूर्वी मदत मिळण्याची अपेक्षा असताना तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकऱ्यांना सणाच्या काळातही आर्थिक दिलासा मिळू शकला नाही.

पुण्यनगरीत रंगणार Table Tennis चा थरार! 'या' देशांचे खेळाडू होणार सहभागी, विजेत्याला...

Coffee: तुम्हालाही कॉफी प्यायला आवडते का? जाणून घ्या कॉफीचे ८ लोकप्रिय प्रकार आणि त्यांची खासियत!

भारतात घुसखोरी करून बनवले बनावट आधार कार्ड; बांगलादेशी तरुणाला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Yavatmal News: नवीन पाण्याच्या टाकीच्या बांधकामावरून वाद; जलकुंभांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Yellow Eyes Dark Urine Pale Stool Causes: शरीरात दिसणारी 'ही' 3 लक्षणं देतात गंभीर आजारांचा इशारा; कावीळ समजून दुर्लक्ष नको