शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची केली सरमिसळ
अन्नपदार्थांजवळ आढळली धुळ
१५ दिवसांची मुदत; फेरतपासणीनंतरच व्यवसाय सुरू करता येणार
FDA Raid Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर ग्राहकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरासह जिल्ह्यात धडक कारवाई केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, मिठाई दुकाने, डेअरी आणि ऑनलाइन डार्कस्टोअर अशा १२ आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळले.
त्यामुळे या सर्व आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली आहेत. संबंधित व्यावसायिकांना अन्न तयार करणे, विक्री आणि वितरण बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एफडीएच्या पथकांनी शहर आणि जिल्ह्यातील विविध आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीत अनेक ठिकाणी कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, - शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची सरमिसळ, - अस्वच्छ स्वयंपाकघर, गंजलेली उपकरणे, अयोग्य साठवणूक, कीडनियंत्रणाचा अभाव, पाणी व अन्नपदार्थाच्या तपासणी अहवालांची अनुपलब्धता अशा त्रुटी आढळल्या. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक संरक्षक पोशाखही नव्हते. या गंभीर त्रुटींच्या आधारे सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी द. वि. पाटील यांनी १२ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले.
उस्मानपुरा-इटखेडा येथील ब्लिंक कॉमर्स प्रा.लि. च्या ब्लिंकिट स्टोअरमध्ये अन्न आणि अखाच वस्तू एकाच ठिकाणी साठविल्या जात असल्याचे आढळले. खराब पिशव्यांमुळे उघडचा अन्नपदार्थाजवळ चूळ आणि घाण साचत होती. अस्वच्छ शौचालय, अपुरी कीडनियंत्रण व्यवस्था तसेव कर्मचा-यांकडे एपन आणि वैद्यकीय तपासणीचा अभाव असल्याचेही तपासणीत समोर आले. बीड चायपास रोडवरील एमआयटी कॅन्टीनमध्ये कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवण्यात येत होते. खिडक्या आणि एक्झॉस्ट फॅनला कीडपतिबंधक जाळ्या नव्हत्या, पाणी व तेलाच्या परीक्षणाचे अहवाल उपलब्ध नव्हते, कचरा व्यवस्थापनातही त्रुटी आढळल्या. देवळाई येथील हॉटेल न्यू राज दरबारमध्ये पूर्वसूचना देऊनही सुधारणा करण्यात आली नव्हती.
सर्व १२ आस्थापनांना अन्न तयार करणे, विक्री आणि वितरण तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित व्यावसायिकांनी १५ दिवसांच्या आत तपासणीत आढळलेल्या सर्व त्रुटी दूर करून त्याबाबतचे पुरावे आणि अहवाल सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रशासनाकडून फेरतपासणी केली जाणार आहे. त्रुटींची समाधानकारक पूर्तता झाल्याचे आढळल्यास आणि सक्षम प्राधिकाऱ्यांचे लेखी आदेश मिळाल्यानंतरच संबंधितांना व्यवसाय पुन्हा सुरू करता येईल, असे सांगण्यात आले.