Gold Price Falls by ₹15,000, Silver Becomes Cheaper by ₹60,000 in 10 Days ( १० दिवसांत सोन्याच्या दरात १५,००० रुपयांची, तर चांदीच्या दरात ६०,००० रुपयांची घसरण ) फोटो सौजन्य AI  
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Bullion Market : सोनं-चांदी स्वस्त झालं, पण ग्राहकांची प्रतीक्षा कायम; सराफा बाजारात खरेदी मंदावली

Sambhajinagar Bullion Market : छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठ ते दहा दिवसांत सोनं तोळ्यामागे १५ हजारांनी, तर चांदी किलोमागे ६० हजारांनी स्वस्त.

sanman jadhav
  • लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदीचे नियोजन  
  • दर घसरले, तरी ग्राहकांचा हात आखडता 
  • आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम 

Sambhajinagar Bullion Market : छत्रपती संभाजीनगर येथे सोन्या-चांदीच्या दरांनी घेतलेली विक्रमी झेप आता उलट दिशेने सुरू झाली आहे. आठ ते दहा दिवसांत सोन्याच्या दरात तोळ्यामागे सुमारे १५ हजार रुपये, तर चांदीच्या दरात किलोमागे तब्बल ६० हजार रुपयांची घसरण झाली आहे. एवढी मोठी दरकपात होऊनही ग्राहकांनी खरेदीसाठी घाई करण्याऐवजी आणखी भाव उतरतील, या अपेक्षेने प्रतीक्षा करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दर कमी, पण बाजारातील खरेदीही कमी, असे विरोधाभासी चित्र सराफा बाजारात पाहायला मिळत आहे.

लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदीचे नियोजन

काही दिवसांपूर्वी सोन्याने तोळ्यामागे १ लाख ४५ हजार रुपयांचा, तर चांदीने किलोमागे २ लाख २५ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. आता सोन्याचे दर १ लाख ३० हजार, तर चांदीचे दर १ लाख ६५ हजार रुपयांवर आले आहेत. या घसरणीमुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदीचे नियोजन करणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दर आणखी खाली येतील का, याचा अंदाज घेत ग्राहकांनी सध्या खरेदी लांबणीवर टाकली आहे.

दर घसरले, तरी ग्राहकांचा हात आखडता

सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर सराफा बाजारात खरेदी वाढेल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांकडून मोठ्या खरेदीला प्रतिसाद मिळत नाही. सतत बदलणाऱ्या दरांमुळे ग्राहक संभ्रमात असून, दर स्थिर झाल्यानंतरच खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम

अमेरिकेतील व्याजदरविषयक धोरण, बैंकांमधील गुंतवणुकीवरील मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळणारा गुंतवणुकदारांचा कल कमी झाल्याने मागणीवर परिणाम होत आहे. सोन्या-चांदीचे दर कमी झाले असले तरी ग्राहक अद्याप प्रतीक्षेत आहेत. दर स्थिर झाल्यानंतरच बाजारात खरेदी वाढेल. असे छत्रपती संभाजीनगर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक म्हणाले.

Japanese Couple Viral Video : घटस्फोटानंतर चार वर्षांनी पुन्हा प्रेम जुळले! जपानी जोडप्याने लखनौमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार केले लग्न

Tarali Project Controversy: तारळी प्रकल्पाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; सयाजी शिंदेंनी उघडला कायदेशीर लढ्याचा मोर्चा!

FSSAI Action Against Bisleri: बापरे...! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल

Lions Viral Video : आजूबाजूला सिंहच सिंह, तरीही बाईकस्वार बिनधास्त पुढे; झांबियातील थरारक व्हिडिओ व्हायरल

PM Modi Balen Shah Meet: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना पीएम मोदींची मोठी भेट! IIT कॅपसबाबत घेतला 'हा' मोठा ऐतिहासिक निर्णय