'धनंजय मुंडेंच करू शकतात वाल्मिक कराडचा गेम'; करुणा शर्मांच्या दाव्याने खळबळ 
महाराष्ट्र

Karuna Sharma : 'धनंजय मुंडेंच करू शकतात वाल्मिक कराडचा गेम'; करुणा शर्मांच्या दाव्याने खळबळ

धनंजय मुंडेंचे कालेचिठ्ठे वाल्मिक कराडकडे आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा गेम करू शकतात, असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे.

संदीप गावडे

भाजप पक्ष इतका मोठा आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही छबी महाराष्ट्रात खूप चांगली आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की भाजप धनंजय मुंडेंनी एन्टरटेनमेंट करेल. धनंजय मुंडेंचे कालेचिठ्ठे वाल्मिक कराडकडे आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा गेम करू शकतात, असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी सरेंडर केला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यांनी सरकारला मदत केली पाहिजे. त्यांच्याकडे असलेले पुरावेही त्यांनी पोलिसांना दिले पाहिजे. कारण पोलीस भ्रष्ट लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम करू शकतात. तसंच पोलिसांचा गैरवापर महाराष्ट्र सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

माझ्या कारमध्ये चार रिव्हॉल्वर टाकण्यात आल्या होत्या. डीवायएसपी आणि २०-३० पोलिसांनी माझ्या घराची झडती घेतली. माझ्या लग्नाचे फोटो, लॅपटॉप, मोबाईल आणि इतर काही पुरावे पोलीस घेऊन गेले. माझ्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलिट केला होता. त्यात धनंजय मुंडे यांच्या सर्व अनधिकृत गोष्टींचे पुरावे होते, तेही हटवण्यात आले, असा गैरवापर पोलिसांकडून सुरू असल्याचा दावाही करूना वर्मा यांनी केला आहे. त्याची सर्व माहिती वरळी पोलीस स्टेशनमध्ये आहे, ते येत्या पाच-सहा दिवसात मला मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पदवी नाही, वैद्यकीय नोंदणीही नाही; तरीही रुग्णांवर उपचार सुरू! बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले

Coconut Oil Flooring: नारळाच्या तेलापासून तयार होतंय घराचं फ्लोरिंग! दक्षिण भारतातील अनोखी पद्धत पाहून व्हाल थक्क

परदेश प्रवासात इंटरनेटचा वापर होणार अधिक सुलभ! WhatsApp लवकरच घेऊन येणार नवीन ट्रॅव्हल ई-सिम फीचर, असं करणार काम

Supriya Sule Apologies: मी हात जोडून माफी मागते; रोहित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

Crochet: तुम्हीही क्रोशे विणकाम करताय का? जाणून घ्या धाग्यांचे प्रकार आणि विणकाम करताना कोणत्या चुका टाळाव्यात!