वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक ५ वर ७५ दिवस दुरुस्तीचे काम.
अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या स्थानकांमध्ये बदल; काही गाड्या बोरिवली आणि दादरहून धावणार.
१ डिसेंबर ते १३ फेब्रुवारीदरम्यान चार उपनगरीय लोकल रद्द.
पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्र. 5 वरील दुरुस्ती आणि पुन्हा बांधकामासाठी 1 डिसेंबर ते 13 फेब्रुवारी या काळात 75 दिवसांचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे अनेक मेल / एक्स्प्रेस गाड्यांच्या स्थानकांमध्ये बदल करण्यात आलाय. तसेच 4 उपनगरीय लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. प्रवासाला निघण्याआधी ही यादी एकदा नक्की बघा, नाहीतर ऐनवेळी गोंधळ होईल.
1. भुज - वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस - 30 नोव्हेंबर ते 12 फेब्रुवारी दरम्यान ही गाडी वांद्रेऐवजी दादर स्थानकावरच थांबेल. तिथेच तिचा प्रवास संपेल.
2. वांद्रे टर्मिनस - भुज एक्स्प्रेस - ही गाडी वांद्रेऐवजी दादरहून संध्याकाळी 5:40 वाजता सुटेल.म्हणजे भुजला जायचं असेल तर आता तुम्हाला दादरला जावं लागणार आहे, वांद्रेला जाऊन उपयोग नाही.
काही गाड्या ज्या आधी दादरपर्यंत यायच्या, त्या आता वांद्रे टर्मिनस पर्यंतच येणार आहेत.
1. अजमेर - दादर एक्स्प्रेस - ही गाडी दादर ऐवजी वांद्रे टर्मिनस पर्यंतच धावेल व तिथूनच दुपारी 2:55 वाजता सुटेल.
2. श्री गंगानगर - दादर एक्स्प्रेस - ही पण गाडी वांद्रे टर्मिनसपर्यंतच येईल व दुपारी 2:55 वाजता परतीच्या प्रवासाला निघेल.
3. भगत की कोठी - दादर एक्स्प्रेस - ही गाडी पण वांद्रे टर्मिनसपर्यंतच चालवली जाईल व दुपारी 2:55 वाजता सुटेल.
1. येणाऱ्या गाड्या - भुज (22904), उधना (19056), मडगाव (10116), जयपूर (19723) आणि दौराई (19625) येथून वांद्रे टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या ब्लॉकच्या काळात बोरिवली स्थानकावरच संपतील. त्या पुढे वांद्रेला जाणार नाहीत.
2. जाणाऱ्या गाड्या - परतीच्या प्रवासात उधना (सकाळी 9:40), मडगाव (सकाळी 7:25), जयपूर (सकाळी 9:25) आणि दौराई (सकाळी 9:25) या एक्स्प्रेस गाड्या वांद्रे टर्मिनसऐवजी बोरिवली स्थानकावरून सुटतील.
1.चर्चगेट - बोरिवली फास्ट लोकल (दुपारी 2:50)
2. बोरिवली - चर्चगेट स्लो लोकल (दुपारी 3:40)
3. चर्चगेट - बोरिवली एसी फास्ट लोकल (सायंकाळी 5:28)
4. बोरिवली - चर्चगेट एसी फास्ट लोकल (सायंकाळी 6:24)त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्यांनी वेळेचं थोडं नियोजन करूनच घराबाहेर पडा.