पावसाळ्यासाठी मनपा आतापासूनच सज्ज! रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वर्मा-लवंगारेंच्या सूचना  
मुंबई

Mumbai News: पावसाळ्यासाठी मनपा आतापासूनच सज्ज! रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वर्मा-लवंगारेंच्या सूचना

कुर्ला, शीव, चुनाभट्टी, परळ आणि मानखुर्द यांसारख्या सखल रेल्वे स्थानक परिसरात सावणाऱ्या पाण्यावर मात करण्यासाठी रेल्वे आणि पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने संयुक्तपणे कामे हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सुरुची कदम

आगामी २०२७च्या पावसाळ्यात मुंबईकरांची रस्ते आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीमुळे कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहा महिने आधीच कंबर कसली आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी मागील पावसाळ्यातील अनुभवांचा आधार घेत आपापसात उत्तम समन्वय साधावा आणि पावसाळापूर्व कामे नियोजनबद्धरीत्या पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दि. २५ नोव्हेंबर पावसाळा पूर्वतयारीबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर, डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह मध्य व पश्चिम रेल्वे, मुंबई वाहतूक पोलीस, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी एनर्जीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी सादरीकरणाद्वारे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

आपत्कालीन घटनांची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न

पावसाळ्यात झाडे कोसळून रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी उद्यान आणि रस्ते विभागाने एकत्रितपणे धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. मॅनहोलमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कामांमध्ये प्रमाणित कार्यपद्धतीचा काटेकोर वापर करावा, तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी नाल्यांच्या कडेला आणि उंच झोपड्यांच्या परिसरात विशेष जाळ्या बसवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरड प्रवण क्षेत्रे, शॉर्टसर्किट आणि इमारत कोसळण्यासारख्या आपत्कालीन घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून आगामी सहा महिन्यांचा योग्य वापर करावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

संयुक्तपणे कामे हाती घेण्याचे अभिजीत बांगर यांचे निर्देश

बैठकीत मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा सखोल अभ्यास करण्यावर भर दिला. वाहतूक पोलिसांनी पावसाचे पाणी साचण्याची ठिकाणे, कालावधी आणि पाण्याचा निचरा होण्यास लागणारा वेळ याची सविस्तर माहिती द्यावी, जेणेकरून त्या आधारे पर्जन्य जलवाहिन्या विभागाला योग्य उपाययोजना करता येतील, असे ते म्हणाले. तसेच कुर्ला, शीव, चुनाभट्टी, परळ आणि मानखुर्द यांसारख्या सखल रेल्वे स्थानक परिसरात सावणाऱ्या पाण्यावर मात करण्यासाठी रेल्वे आणि पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने संयुक्तपणे कामे हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासोबतच भूमिगत मेट्रो स्थानकांतील पाणी निचरा व्यवस्था आणि उन्नत मेट्रो व पुलांवरील पावसाळी वाहिन्या सुस्थितीत असल्याची चाचपणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Share Market Today: शेअर बाजारात गॅप-अप ओपनिंगचे संकेत, कोणते शेअर्स तज्ज्ञांच्या रडारवर? जाणून घ्या

Vastu Tips: चुकूनही कोणाला भेट म्हणून देऊ नका या वस्तू, नात्यांमध्ये येऊ शकतो दुरावा

Maharashtra Cabinet Decisions: राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! ४२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य

Weather Update : राज्यातील हवामान राहणार संमिश्र; कुठं थंडी तर कुठं उष्णतेची लाट मिळणार अनुभवायला

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या