क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! ( सौजन्य - सोशल मीडिया )  
पालघर

Vasai Police : क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! वसई पोलिसांनी आवळल्या गोव्यातील मास्टरमाइंड्सच्या मुसक्या

Vasai Police : वसईच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाने क्रिकेट, फुटबॉल आणि ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या एका मोठ्या आंतरराज्य सट्टेबाजी टोळीचा पर्दाफाश केला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावर ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या या रॅकेटच्या मुसक्या वसई पोलिसांनी थेट गोव्यात आणि पुण्यात सापळा रचून आवळल्या आहेत.

Ankita Karangutkar
  • आंतरराज्य ऑनलाइन बेटिंग टोळी गजाआड
  • गोव्यातून सूत्रधारांना ठोकल्या बेड्या
  • व्यवहारांसाठी 'म्युल अकाउंट'चा वापर

Vasai Police : क्रिकेट, फुटबॉल आणि ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली बेकायदेशीर सट्टेबाजी (बेटिंग) चालवून सर्वसामान्यांच्या बँक खात्यांचा अपहार करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा गुन्हे प्रकटीकरण कक्ष-२ने (वसई) पर्दाफाश केला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज आशिया कप २०२६ च्या फायनल सामन्यावर ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या या रॅकेटच्या मुसक्या थेट गोव्यात आवळण्यात आल्या असून, आतापर्यंत ९ आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना मोठे यश आले. या कारवाईत पोलिसांनी जवळपास १० लाखांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, लॅपटॉप, ६३ मोबाईल आणि डझनभर बँक खात्यांचे साहित्य जप्त केले आहे. नायगाव पूर्व येथील सनटेक हिल वहा-१ या सोसायटीतील एका पलॅटमधून ऑनलाईन बेटिंगचा खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. ( Vasai Police ) 

व्यवहारांसाठी 'म्युल अकाउंट'चा वापर

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकून मुख्य आरोपी फुरकान अहमद जसीमुद्दीन अन्सारी (वय २१) याला ताब्यात घेतले. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, आरोपी' रेडी बुक' आणि' रेडी ६६ या पॅनलद्वारे क्रिकेट, रमी, फुटबॉलवर सट्टा चालवत होते. लोकांची दिशाभूल करून त्यांच्या नावावर सिमकार्ड आणि बैंक खाती उघडून त्याचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी 'म्युल अकाउंट म्हणून केला जात होता. या ठिकाणाहून पोलिसांनी ५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिस आयुक्त निकेत कौशिक, पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त संजय शिंत्रे, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त गोंडूराम बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-२चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील पवार, पोलिस उपनिरीक्षक अजित गिते, संतोष घाडगे, सफौज मुकेश पवार, रवींद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, पोहवा सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, राहुल कर्पे, पोलिस अंमलदार अनिल साबळे, पोलिस शिपाई अक्षय बांगर, मसुब आकाश जाधव, मसुब मंगेश भगत, सफौज संतोष चव्हाण यांनी ही कारवाई केली.

गोव्यातून सूत्रधारांना अटक

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भारतीय, आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकांचा माग काढला. अंतिम सामन्यादरम्यान नितिन ऑनलाइन बुक पॅनलवरून थेट बेटिंग सुरू असताना पोलिसांनी उत्तर गोव्यातील पोरवोरीम येथे छापा टाकला. तेथून नितीन माखिजानी (वय ४५), करण तनवानी (वय २१), दीपक बत्रा (वय २६), हृतिक खूबचंदानी (वय २६), राकेश वाधवानी (वय ३०) आणि मोहित पोपटानी (वय २४) या ६ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Wardha News: वर्ध्यात पीककर्ज वाटपाला ब्रेक! ११ हजार शेतकऱ्यांनाच रब्बी पीककर्ज, उर्वरित शेतकऱ्यांचे काय?

Dalimb: जितेंद्र कुमार-प्रिया बापटचा सायकोलॉजिकल थ्रिलर ‘डाळिंब’, ४ डिसेंबरला हिंदी ZEE5 वर प्रदर्शित होणार!

Supreme Court on Rahul Gandhi: सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना मोठा दिलासा! 'त्या' प्रकरणातील चौकशीचे आदेश रद्द

Sanch Manyata Update: शिक्षकांच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता? संच मान्यतेचा डेटा अंतिम करण्यासाठी 'ही' डेडलाईन

Vaibhav Suryavanshi: 'दबदबा है और...'; वैभवने यूएईची पिसं काढली, सोशल मिडियावर Memes चा पाऊस