मीरा-भाईंदरकरांना नववर्षात दिलासा, 'सूर्या'चे ५० ते ६० दशलक्ष लिटर पाणी मिळणार  ( सौजन्य - सोशल मीडिया )
पालघर

Mira Bhayandar Water Supply : पाणीटंचाईतून सुटकेची चाहूल! मीरा-भाईंदरकरांना दिलासा! जानेवारीत 'सूर्या'चे 50 ते 60 दशलक्ष लिटर पाणी मिळणार

Mira Bhayandar Water Supply :

Ankita Karangutkar
  • मीरा-भाईंदरकरांना नववर्षात दिलासा

  • 'सूर्या'चे ५० ते ६० दशलक्ष लिटर पाणी मिळणार

  • एमएमआरडीएच्या बैठकीत आढावा

Mira Bhayandar Water Supply : वाढत्या लोकसंख्येमुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मिरा-भाईंदर शहराला सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शहराला ५० ते ६० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील एमएमआरडीए कार्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील दोन महिन्यांत योजनेचे संपूर्ण २१८ दशलक्ष लिटर पाणी शहरात आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

प्रशासनाने तांत्रिक कामांना वेग दिला

योजनेचा पहिला टप्पा वेळेत सुरू करण्यासाठी प्रशासनाने तांत्रिक कामांना वेग दिला आहे. बैठकीतील निर्णयानुसार, १३२ केव्ही वीजपुरवठा प्रकल्पाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वी अंतर्गत जलवाहिन्यांची स्वच्छता (फ्लॅशिंग) करणे आवश्यक असल्याने, पुढील आठवड्यापासून हे काम सुरू करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. फ्लॅशिंगच्या या प्रक्रियेला सुमारे महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

सूर्या योजनेतील पाण्याचा पहिला टप्पा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन असून, पुढील दोन महिन्यांत संपूर्ण २१८ दशलक्ष लिटर पाणी मिरा-भाईंदर शहरात आणण्याचे उद्दिष्ट बैठकीत निश्चित करण्यात आले - प्रताप सरनाईक, मंत्री

टप्प्याटप्प्याने पिण्याचे पाणी उपलब्ध करणार

शहरात पाण्याचे वितरण सुरळीत व्हावे यासाठी आठ जलकुंभ उभारण्यात आले आहेत. यापैकी ज्या भागांतील जलवाहिन्यांची जोडणी पूर्ण झाली आहे, तेथे जानेवारीत सर्वप्रथम पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील उर्वरित भागांना पाणी उपलब्ध करून दिले जाईल.

जानेवारीपासून शहराला अतिरिक्त पाणी मिळणार

सध्या मिरा-भाईंदर शहराला स्टेम आणि एमआयडीसीकडून दररोज २११ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढलेली मागणी यामुळे हा पुरवठा अपुरा ठरत असून, नागरिकांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सूर्या योजनेतून शहराला २१८ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मंजूर करण्यात आले आहे. परंतु, वीजपुरवठा आणि विद्युत मनोरे उभारण्याच्या कामातील अडथळ्यांमुळे हे पाणी अद्याप शहरात पोहोचू शकले नव्हते. आता वीज प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने जानेवारीपासून शहराला टप्प्याटप्प्याने अतिरिक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pramod Mittal : जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाला लागली उतरती कळा; प्रमोद मित्तल यांच्या लंडन मेफेअरमधील 'त्या' 357 कोटींच्या बंगल्याचा वाद काय?

मूळव्याध समजून शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत आहात? उद्भवू शकतो मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरचा धोका

Instagram For TV : आता स्मार्ट टीव्हीवरही वापरता येणार इन्स्टाग्राम; एकाच वेळी 5 अकाऊंट्स येतील जोडता

Rishabh Pant: केवळ २३ धावा अन् ऋषभ पंतचा मोठा कारनामा! बेन स्टोक्सचा रेकॉर्ड मोडला

Coconut Importance: प्रत्येक शुभकार्याची सुरुवात नारळानेच का केली जाते? जाणून घ्या यामागील धार्मिक आणि आध्यात्मिक कारण