बोगस दिव्यांगत्वाचा लाभ घेणाऱ्या ५ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
४१ जणांच्या बदल्या दुर्गम भागात दिव्यांगत्वाचे लाभ बंद
दिव्यांगत्वाचे लाभ बंद, आतापर्यंत घेतलेल्या सुविधांची वसुलीही होणार
आकाश ढुमे : पुणे : दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांचा आधार घेऊन नोकरीतील सवलती आणि सुविधांचा लाभ घेतल्याचा संशय असलेल्या शिक्षकांवर पुणे जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वैद्यकीय फेरतपासणीत दिव्यांगत्वाचे प्रमाण अत्यल्प आढळलेल्या पाच शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून, अन्य ४१ शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे लाभ बंद करून त्यांची दुर्गम भागातील शाळांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय, त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या लाभांची वसुलीही केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी (२५ नोव्हेंबर) ही माहिती दिली. जिल्ह्यातील सुमारे ४५० शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची औंध जिल्हा रुग्णालय आणि ससून रुग्णालयात वैद्यकीय फेरतपासणी करण्यात आली. यामध्ये पाच शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी, तर अन्य ४१ शिक्षकांचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच शिक्षकांची विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशीत प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित ४१ शिक्षकांचे दिव्यांगत्वाशी संबंधित लाभ बंद करून त्यांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नियुक्त केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेकडे ४०९ शिक्षकांनी दिव्यांग असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती. मात्र, प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबत दिव्यांग संघटनांनी आक्षेप घेत फेरतपासणीची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली.
NCCचा अनोखा उपक्रम! आता युवकांना मिळणार AI चे धडे; सहा तासांच्या प्रशिक्षणातून काय शिकणार?
आणखी ३५० शिक्षकांची तपासणी
जिल्ह्यातील आणखी सुमारे ३५० शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची वैद्यकीय पडताळणी सुरू आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल. तसेच जिल्हा परिषदेच्या अन्य विभागांतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांचीही फेरतपासणी करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील हल्ला प्रकरणावर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'गंभीर...'
पुणे जिल्हा परिषदेने कोणत्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे?
दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांचा आधार घेऊन नोकरीतील सवलती आणि सुविधांचा लाभ घेतल्याचा संशय असलेल्या शिक्षकांवर पुणे जिल्हा परिषदेने कारवाई सुरू केली आहे.
शिक्षकांवर कोणत्या कारणामुळे कारवाई केली जात आहे?
दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीतील विविध सवलती आणि सुविधांचा लाभ घेतल्याचा संशय असल्याने संबंधित शिक्षकांची पडताळणी करून कारवाई केली जात आहे.
या प्रकरणात पुणे जिल्हा परिषदेची भूमिका काय आहे?
दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांचा गैरवापर झाल्याचा संशय असलेल्या शिक्षकांविरोधात पुणे जिल्हा परिषदेने कारवाईची भूमिका घेतली आहे. मात्र, कारवाईचा नेमका तपशील उपलब्ध माहितीत दिलेला नाही.