Sugarcane News 
पुणे

‘३,९०० रुपये पहिली उचल द्या, अन्यथा...’; देवदत्त निकम यांचा भीमाशंकर कारखाना प्रशासनाला इशारा

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली.

Dnyaneshwar more

मंचर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी जाहीर केलेली प्रतिटन ३,६०० रुपयांची पहिली उचल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मान्य नसून, कारखान्याने प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली. ही मागणी मान्य न केल्यास कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निकम यांनी दिला.

शनिवारी (दि. २८) मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष विशाल वाबळे, तेजस जाधव आणि शंकरराव टेमगिरे उपस्थित होते.

देवदत्त निकम म्हणाले की, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची यंदाची एफआरपी प्रतिटन ३,२७४ रुपये आहे. असे असताना कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रतिटन ३,६०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, सध्याची साखरेची बाजारपेठेतील परिस्थिती आणि कारखान्याला साखरेसोबतच विविध उपपदार्थांमधून मिळणारे उत्पन्न विचारात घेता शेतकऱ्यांना प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल देणे शक्य आहे, असा दावा त्यांनी केला.

मागील वर्षी साखरेचा दर प्रतिक्विंटल ३,७०० रुपये होता. यंदा ऊस उत्पादनासाठी लागणारा खर्च वाढला असून, मजुरी, खते, औषधे आणि अन्य कृषी निविष्ठांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पहिली उचल वाढवावी, अशी मागणी निकम यांनी केली.

३,९०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर न केल्यास भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

भीमाशंकर साखर कारखान्याकडून सध्या किती पहिली उचल जाहीर करण्यात आली आहे?

कारखाना प्रशासनाने यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३,६०० रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे.

देवदत्त निकम यांची काय मागणी आहे?

कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली आहे.

मागणी मान्य न झाल्यास काय इशारा देण्यात आला आहे?

प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल जाहीर न केल्यास भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देवदत्त निकम यांनी दिला आहे.

Gold Price Outlook : सोनं 1 लाखांच्या खाली येणार? एक्सपर्टनी थेट सांगितलं; पुढील 6 महिन्यांत 'या' रेंजमध्ये राहणार भाव

'अतिक्रमणांवरील कारवाई थांबणार नाही, अधिकाऱ्यांनी हात आखडता घेतल्यास...'; महापालिका आयुक्तांची कडक भूमिका कायम

Ramayana OTT Release: थिएटरनंतर ‘रामायण’ ओटीटीवर कधी पाहता येणार? नमित मल्होत्रांनी सांगितली रिलीजबाबत महत्त्वाची माहिती

Mahindra Vision S SUV 2027 मध्ये होणार लाँच! स्कॉर्पिओ एनसारखा लूक आणि खास फीचर्सची झलक

IND vs NZ: शतक हुकलं, पण इतिहास रचला! टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला Dhruv Jurel; धोनी-मोरे यांच्या क्लबमध्ये एन्ट्री