पुणे विभाग जादा बसेस सोडणार (फोटो- सोशल मिडिया) 
पुणे

MSRTC: उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायचंय? 'मग 'ही' बातमी वाचाच; थेट...

उन्हाळ्यात शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक कुटुंबे गावाकडे किंवा पर्यटनासाठी बाहेर जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे रेल्वे आणि खासगी वाहतुकीबरोबरच एसटी बसस्थानकांवरही मोठी गर्दी होत आहे.

तेजस भागवत

उन्हाळी सुट्ट्यात पुण्यातून ४५० अतिरिक्त बस

१५ एप्रिल पासून १५ जूनपर्यंत अतिरिक्त बस सोडणार 

राज्यातील विविध मार्गांवर धावणार लालपरी

पुणे: उन्हाळी सुट्यांचा कालावधी सुरू होताच गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या गर्दीचा विचार करून पुणे एसटी विभागाने १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत  ४५० अतिरिक्त बस सोडण्याचा  निर्णय घेतला आहे. या बस पुण्यातून कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर तसेच कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत.

उन्हाळ्यात शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक कुटुंबे गावाकडे किंवा पर्यटनासाठी बाहेर जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे रेल्वे आणि खासगी वाहतुकीबरोबरच एसटी बसस्थानकांवरही मोठी गर्दी होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.

स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या प्रमुख बसस्थानकांतून अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. विशेषतः दादर, ठाणे, बोरिवली, पंढरपूर, लातूर, धुळे, अकोला अशा मार्गांवर जादा बस सोडण्यात येतील. यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

खासगी वाहनांच्या तुलनेत सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरात पुणे एसटी विभागाकडून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी  उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत गावी जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा.

अरुण सिया,

विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग

चालक-वाहकांना द्यावी लागणार ‘ही’ टेस्ट

प्रवाशांच्या जीविताशी संबंधित सुरक्षेला प्राधान्य देत राज्य परिवहन महामंडळाने पुणे एसटी विभागात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे चालक आणि वाहक या दोघांचीही ड्युटी सुरू होण्यापूर्वी ‘अल्कोटेस्ट’ चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीत पात्र ठरल्यानंतरच चालकांच्या हाती बसचे स्टेअरिंग दिले जाणार आहे.

पुणे विभागात एकूण 8८२ चालक, १,०५२ वाहक आणि ९१२ बस कार्यरत आहेत. दररोज या सर्व चालक-वाहकांची अल्कोटेस्टद्वारे तपासणी केली जाणार असून, प्रत्येक आगारात यासाठी विशेष यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तपासणीचे निकाल डिजिटल स्वरूपात नोंदवले जाणार आहेत, जे भविष्यातील शिस्तभंग कारवाईसाठी पुरावा म्हणून वापरले जाणार आहेत. मद्यप्राशन करून ड्युटीवर आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पहिल्या वेळी दोषी आढळल्यास निलंबन, तर वारंवार असे प्रकार घडल्यास सेवासमाप्तीची कारवाई केली जाईल.

Rice Price Update : तांदळाच्या दराबाबत मोठी बातमी! सरकारने अचानक लावला 20% Tax; सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार?

EPF Rules Changes Proposal : PF मधून 90% रक्कम काढल्यास रिटायरमेंटला 27 लाखांचा फटका? नियमांमध्ये कोणत्या 2 मोठ्या बदलांचा प्रस्ताव

Priyansh Arya : प्रियांश आर्यने रचला इतिहास, भारताच्या वतीने टी-20 मध्ये सर्वात मोठी खेळी करणारा ठरला फलंदाज

Amravati News: कोसा रेशीम उद्योगाला दुष्काळाच्या झळा! टसर उद्योगाला ६० टक्क्यांपर्यंत फटका बसल्याचा अंदाज

Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात होईल नष्ट! 'ही' फळे ठरतील शरीरासाठी गुणकारी