पुणे मेट्रो (फोटो- ai gemini/प्रातिनिधिक) Pune Metro Line 3
पुणे

Pune Metro आता थांबणार नाय! 'या' मार्गावर दररोज ५० हजार प्रवाशांचा प्रवास

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक या गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स बसविण्यात आले आहेत.

तेजस भागवत
  • पुणे मेट्रो लाईन ३ ला प्रवाशांची पसंती

  • रोज ५० हजार प्रवाशांचा प्रवास

  • जिल्हा न्यायालय, वाकड चौक स्थानकांवर अतिरिक्त तिकीट गेट्स

Pune Metro: हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगरदरम्यान धावणाऱ्या पुणे मेट्रोच्या लाईन ३ ला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. ११ नोव्हेंबरपासून या मार्गावर दररोज जवळपास ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक या गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स बसविण्यात आले आहेत. तसेच गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांची ये-जा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा न्यायालय, (Pune) माण, आर. के. लक्ष्मण म्युझियम, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वाकड चौक या स्थानकांना प्रवाशांची विशेष पसंती मिळत आहे. या स्थानकांवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने (पीआयटीसीएमआरएल) आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. अतिरिक्त तिकीट गेट्समुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना होणारा विलंब कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या लाईन ३ वर २० मेट्रो गाड्या धावत असून, दररोज सुमारे ३०० फेऱ्या होत आहेत. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी, तर इतर वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध आहे. प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून या मार्गावरील मेट्रो गाड्या सुमारे ९९ टक्के वेळेवर धावत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

याबाबत पीआयटीसीएमआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी म्हणाले, "प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक प्रवाशांनी सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहिले जात आहे. हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही मेट्रोला पसंती देत आहेत. त्यामुळे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा (एनसीएमसी) वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे."

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेचा लवकरच होणार विस्तार; दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये सेवेत?

बालेवाडी परिसरातील बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. उर्वरित स्थानकांची कामेही लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कामाचा दर्जा आणि प्रवाशांची सुरक्षितता यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सैनी यांनी स्पष्ट केले.

पुणे मेट्रो लाईन ३ हा माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगरदरम्यानचा २३.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावरील १७ स्थानके सध्या प्रवाशांसाठी सुरू असून, मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्कचा शहरातील निवासी, व्यावसायिक आणि शैक्षणिक भागांशी संपर्क अधिक सुलभ झाला आहे. रस्ते वाहतुकीला पर्याय उपलब्ध झाल्याने नोकरदार आणि नियमित प्रवाशांना दिलासा मिळत आहे.

Pune Metro ची सुसाट घोडदौड! आठ दिवसांत तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांचा प्रवास; वाहतूक कोंडीवर…

लाईन ३ एका नजरेत

एकूण लांबी : २३.३ किलोमीटर

मार्ग : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर

सुरू असलेली स्थानके : १७

धावणाऱ्या मेट्रो : २०

दैनंदिन फेऱ्या : सुमारे ३००

दैनंदिन प्रवासी : जवळपास ५० हजार

गर्दीच्या वेळेत वारंवारता : दर ५ मिनिटांनी

इतर वेळेत वारंवारता : दर ८ मिनिटांनी

वेळेवर धावण्याचे प्रमाण : सुमारे ९९ टक्के

लवकरच सुरू होणारी स्थानके : बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा

पुणे मेट्रोच्या लाईन ३ वर दररोज किती प्रवासी प्रवास करत आहेत?

हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगरदरम्यान धावणाऱ्या पुणे मेट्रोच्या लाईन ३ वर ११ नोव्हेंबरपासून दररोज जवळपास ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत.

पुणे मेट्रोच्या कोणत्या स्थानकांवर अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स बसवण्यात आले आहेत?

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक या दोन गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स बसवण्यात आले आहेत.

भाजप आमदाराच्या ताफ्यातील वाहनांना भरधाव स्कॉर्पिओची धडक; गाडी झाली पलटी

भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार; भारत शत्रूचे ड्रोन हवेतच नष्ट करणार

JEE NEET Update: कोचिंग क्लासेसना बसणार चाप! पुन्हा एकदा १२ वीच्या मार्क्सवर ठरणार विद्यार्थ्यांची रँक?

मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर Prasad Oakची Bollywoodमध्ये झेप! हिंदी सिनेमात करणार दमदार एन्ट्री; चित्रपटाचं नाव काय?

Jio चा धमाका! कंपनीने लाँच केली Happy New Year Offer... अनलिमिटेड 4G आणि 5G डेटासह मिळणार धमाकेदार फायदे