साताऱ्यात सूर्यकिरण एअर शोमुळे वाहतुकीत मोठे बदल! साताऱ्यात सूर्यकिरण एअर शोमुळे वाहतुकीत मोठे बदल!
महाराष्ट्र

Satara News: साताऱ्यात सूर्यकिरण एअर शोमुळे ६ तास ट्रॅफिक बंद! कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग पाहा

Suryakiran Air Show 2026 : भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाचा एअर शो २६ नोव्हेंबरला सातारा सैनिक स्कूल परिसरात होणार आहे. कार्यक्रमासाठी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाहनचालकांसाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले असून संपूर्ण मार्गांची माहिती जाणून घ्या.

Vivek
  • सूर्यकिरण एअर शोमुळे साताऱ्यात सहा तास वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्बंध

  • २६ नोव्हेंबरला सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत प्रमुख रस्ते बंद

  • वाहनचालकांसाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गांची आखणी

सातारा, दि. २३ : भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाचा थरारक हवाई कसरतींचा कार्यक्रम गुरुवारी (दि. २६) सातारा सैनिक स्कूलच्या परिसरात रंगणार आहे. या ऐतिहासिक एअर शोसाठी जिल्हाभरातून विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी व्यक्तींची उपस्थिती लक्षात घेऊन सातारा पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि या मार्गावरील विरुद्ध दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच गोडोली नाका ते साईबाबा मंदिर मार्गे जिल्हा परिषद चौक आणि कनिष्क मंगल कार्यालयाकडून जिल्हा परिषद चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. बॉम्बे रेस्टॉरंटकडून येणाऱ्या वाहनांना अजिंठा चौक आणि गोडोली नाका मार्गे पोवई नाक्याकडे जाता येईल. वाढे फाट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी जुना आरटीओ चौक, पारंगे चौक आणि पोवई नाका हा मार्ग निश्चित केला आहे.

खेड चौकाकडून येणाऱ्या वाहनांना सिव्हिल हॉस्पिटलमार्गे पोवई नाक्याकडे जाता येणार आहे. तर मोळाचा ओढा परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी भुविकास चौक, एसटी स्टँड आणि पोवई नाका हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहराबाहेर जाण्यासाठीही याच मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

दरम्यान, या वाहतूक निर्बंधांमधून रुग्णवाहिका, पोलिसांची वाहने, अग्निशमन दल आणि अन्य सरकारी वाहनांना वगळण्यात आले आहे. एअर शोच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाशिममध्ये चारा टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय; 'व्हीबी-जी रामजी' योजनेंतर्गत ४९१ ग्रामपंचायतींमध्ये लागवड

Pratapgad News : संविधान दिनी प्रतापगडावर स्वच्छता-संवर्धन महाअभियान; राज्यातील ११ किल्ल्यांवर एकाच वेळी उपक्रम

WTC मध्ये मोठी उलथापालथ! आफ्रिकेने बांग्लादेशला लोळवले पण फायदा 'या' संघाला; भारताचे काय होणार?

बोगस दिव्यांगत्वाचा लाभ घेणाऱ्या ५ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई; आतापर्यंत घेतलेल्या सुविधांची होणार वसुली

Buldhana: बुलढाण्यातील महिला उद्योजिकांसाठी आनंदाची बातमी; घरगुती उत्पादनांना मिळणार नवी ओळख, प्रतापराव जाधवांची मोठी घोषणा