महाराष्ट्र

सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा; उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी

Uday Samant at District Planning Committee Meeting Solapur: सोलापुरातील आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक वेळेत उपस्थित न राहिल्याने उद्योगमंत्री उदय सामंत नाराज झाल्यानंतर त्यांनी प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बंद खोलीत कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रियंका मुंदिनकेरी
  • सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा
  • उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी
  • प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यावर नाराज

सोलापूर, शहर: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक वेळेत उपस्थित न राहिल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. प्रोटोकॉलचे पालन न झाल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बंद खोलीत कानउघाडणी केल्याची माहिती समोर येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यानंतर उद्योग विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही बैठक नियोजन समितीच्या बैठकीनंतर घेण्यात यावी, असे निश्चित झाल्याने सामंत यांनी आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करून बैठकीची वेळ पुढे ढकलली होती. मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतरही जवळपास अर्धा तास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक बैठकीसाठी उपस्थित न झाल्याने उद्योगमंत्री संतप्त झाल्याची चर्चा आहे. वरिष्ठ मंत्र्यांना प्रतीक्षा करावी लागणे हा प्रोटोकॉलचा भंग असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात आले.

तर मीच शिवसैनिकांसह तुमच्या कार्यालयात येईन

‘आणखी दहा मिनिटांत बैठकीला उपस्थित राहा, अन्यथा मीच शिवसैनिकांसह तुमच्या कार्यालयात येतो,’ अशा शब्दांत उद्योगमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक तातडीने शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दोन्ही अधिकाऱ्यांसोबत सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रोटोकॉलचे पालन, बैठकीला झालेला विलंब आणि मंत्र्यांना प्रतीक्षा करावी लागल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही अधिकाऱ्यांना सामंत यांनी जाब विचारल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.

Satwai Puja: बाळाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी स्वस्तिकावर का झोपवतात नवजात बालकाला? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Political News : 'सुप्रिया सुळेंसुद्धा १५० कोटी मिळालेत का?' संजय शिरसाट यांचा संजय राऊतांना टोला

IND vs NZ: मैदानात उतरताच यशस्वी जैस्वालने केला 'हा' अनोखा विश्वविक्रम! सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे

शिरूरमध्ये वकिलाचीच केली गेली 1.90 कोटींची फसवणूक; जमीन व्यवहारात घातला गंडा

IBM US Visa : अमेरिकेतील भारतीयांना दणका!'परत जा नोकरी सोडा' IBM ने बंद केली US व्हिसा,Green Card Sponsorship; आता काय होणार?