वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार; आरोपपत्रात उल्लेख (फोटो- सोशल मीडिया) 
महाराष्ट्र

Walmik Karad: वाल्मीक कराडच्या जामीनावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर; नक्की घडतंय तरी काय?

केज कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये केज कोर्टाने वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर लगेचच त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र या अर्जाला सीआयडीने कोर्टात आव्हान दिले आहे.

तेजस भागवत

बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाशी सबंधित खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी वाल्मीक कराडला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास एसआयटी आणि सीआयडी करत आहे. वाल्मीक कराडला सध्या एसआयटी कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज केज कोर्टात वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र ती सुनावणी पुढे गेली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. या प्रकरणात दररोज नवंनवीन खुलासे होत आहेत. विरोधक आणि महायुतीमधील काही नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान वाल्मीक कराडला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध आहे का याचा तपास एसआयटी आणि सीआयडी करत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा आरोप केला हात आहे. दरम्यान या प्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी कोर्टाने सुनावली आहे. मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याला बीड कोर्टाने कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज वाल्मीक कराडच्या केज कोर्टात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती, मात्र आता ही सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र आता ही सुनावणी 23 जानेवारी रोजी म्हणजेच गुरुवारी होणार आहे. वकिलांच्या मागणीनंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

केज कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये केज कोर्टाने वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर लगेचच त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र या अर्जाला सीआयडीने कोर्टात आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडची चौकशी करायची आहे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशी विनंती सीआयडीने कोर्टासमोर केली आहे. दरम्यान आता कोर्ट वाल्मीक कराडला जामीन देणार की कोठडी सुनावणार हे पहावे लागणार आहे.

वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच परळीत वातावरण तापलं

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात केज कोर्टाने  आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यासोबतच वाल्मीक कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.  कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर  परळीतील वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.

वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक होता?

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

अंजली दमानिया यांनी बीड हत्या प्रकरण उचलून धरले आहे. तसेच अनेक धक्कादायक दावे आणि फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत. अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • या वाल्मिक कराड ला शासकीय अंगरक्षक होता???
  • कोणामुळे दिला गेला अंगरक्षक ?
  • अशा माणसांची सुरक्षा आमच्या कराच्या पैशातून होणार ?
  • हा माणूस मुख्यमंत्री लाडकी योजनेचा अध्यक्ष ? कोणी केला ह्यांना अध्यक्ष ?
  • धनंजय मुंडे यांच्या आशिर्वादाने ना ? मग कधी राजीनामा घेणार त्यांचा ?
  • असे अनेक गंभीर FIR पण कारवाई केली गेली नाही ? का ?

असे सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!