Asha Bhosle : 1034 विकेट्स घेणारा गोलंदाज अन् आशा ताईंचा आवाज; 'या' प्रसिद्ध गाण्यामागचं 'तो' प्रसिद्ध किस्सा माहित आहे का? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया) 
सिनेमा

Asha Bhosle : 1034 विकेट्स घेणारा गोलंदाज अन् आशा ताईंचा आवाज; 'या' प्रसिद्ध गाण्यामागचा 'तो' प्रसिद्ध किस्सा माहित आहे का?

Asha Bhosle Death : भारतीय संगीत विश्वातील जादूई आवाज आज हरपला आहे. आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले असून संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे

स्वराली शहा
  • वयाच्या ९२ व्या वर्षी आशा भोसले यांचे निधन
  •  केवळ संगीत विश्वच नव्हे संपूर्ण देशावर शोककळा
  • या प्रसिद्ध गोलंदाजासोबत ताईंनी गायलं होतं गाणं

Asha Bhosle Passes Away : भारतीय संगीत विश्वाला आज मोठा धक्का बसला आहे. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. ११ एप्रिल रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज(दि. १२) त्यांच्या नातीने त्यांना छातीत संसर्ग झाल्याचे सांगितले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पण  तुम्हाला माहिती आहे का गाण्यांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आशा ताईंनी केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या आवाजाचा ठसा उमटवला आहे.

1034 विकेट्स घेणारा गोलंदाज अन् आशा ताईंचा आवाज

आशा ताईंचे क्रिकेट विश्वासी अतिशय खास नाते होते. त्यांनी एका क्रिकेटपटूसोबतही हिंदी गाणे गायले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या क्रिकेटपटूने देखील आपल्या कारकिर्दीत हजारोहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. आशा भोसले यांनी हे गाणे २००६ च्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान गायले होते.

हे गाणे अवघ्या साडेचार तासांत रेकॉर्ड करण्यात आले होते. एक ऑस्ट्रेलियन मुलाग भारतीय मुलीच्या प्रेमात पडल्यावर काय होते यावर आधारित हे गाणे आहे. आशा ताईंनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्यासोबत यू आर द वन फॉर मी हे गाणे गायले आहे. हे गाणे खुद्द ब्रेट लीने हिंदीमध्ये गायले होते.

मैदानावर १०३४ विकेट्स घेणाऱ्या ब्रेटलीने आशा ताईंसोबत गायलेले हे गाणे आजही क्रिकेट आणि संगीत प्रेमींच्या आवडीचे आहे. ब्रेट लीच्या गोलंदाजीसोबतच त्याची आशा ताईंसोबतची केमिस्ट्री चाहत्यांनी भोवली होती.

सचिन तेंडूलकरीशी घट्ट नाते

आशा ताईंचे भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात खेळाडू सचिन तेंडूलकरशी अतिशय घट्ट नाते होते. त्या सचिनला आपल्या मुलाप्रमाणे मानायच्या. त्यांनी अनेकदा म्हटले होते की, सचिन केवळ उत्तम खेळाडून नाही, तर अत्यंत नम्र आणि सुसंस्कृत मुलगा आहे. त्या सचिनचा उल्लेख क्रिकेट विश्वातील महानत कलाकार म्हणून करत. त्यांनी सचिनसोबतही Duet गाणे गाण्याची इच्छा व्यक्त केली होती. याशिवाय आशा ताई भारताचे माजी दिग्गज फलंदाच सुनील गावस्कर यांच्याही चाहत्या होत्या.

Chandrapur News: ११ वर्षांनंतरही चंद्रपूर मेडिकल कॉलेज नव्या इमारतीत नाहीच; प्रतीक्षा संपणार कधी?

Silver Chain Astrology: गळ्यात चांदीची साखळी घालण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Millets: मिलेट्सचे प्रकार कोणते? जाणून घ्या 'या' पौष्टिक धान्यांपासून बनवता येणारे चविष्ट पदार्थ आणि त्यांचे फायदे!

लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड; अविनाश जाधव उपाध्यक्षपदी

'बाबा ऐकत नाहीत…', शरद पवारांना अॅडमिट केल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?