Asha Bhosle 
सिनेमा

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा

Asha Bhosale Hobby : आशा भोसले यांना आपण त्यांच्या गायणावरुन ओळखतो. पण तुम्हाला माहिती आहे का? त्यांना आणखी एका कलेत फार रस होता. या कलेला जिवंत ठेऊनच त्यांनी दुबईत नवा व्यावसाय देखील सुरु केला होता.

नुपूर भगत
  • गायनाव्यतिरिक्त त्यांना एका वेगळ्या कलेची विशेष आवड होती.
  • त्यांनी आपल्या या आवडीचा उल्लेख अनेक मुलाखतींमध्ये केला होता.
  • या छंदाशी संबंधित त्यांनी परदेशात एक खास उपक्रमही सुरू केला.

भारताच्या दिग्गज गायिका आशा भासलेंच यांच वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अचानक ढासळल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या पण त्यांचा आवाज आपल्यासोबत त्या ठेवून गेल्या. आशा भोसलेंनी आजवर हजारो सुपरहिट गाणी देशाला दिली जी ऐकताच आजही मनाला मन त्यांच्या सुरात गुंतुन जातं. आशा भोसले यांना आपण त्यांचा आवाजावरुनच ओळखतो. त्या उत्तम गायिका आहेत हे तर सर्वांनाच ठाऊक आहे पण तुम्हाला माहिती आहे का? गायनाव्यतिरिक्त त्यांना आणखी एका कलेत फार रस होता. या कलेला जपत त्यांनी दुबईत एक व्यावसाय देखील सुरु केला होता. चला ती कोणती कला आहे ते जाणून घेऊया.

या कलेत आशा ताई होत्या तरबेज

आपल्या वैयक्तिक आयुष्यात आशा भोसले यांना स्वयंपाक करायला फार आवडतो. त्यांची स्वयंपाकाबाबतची ही आवड त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये उघड केली आहे. लहानपणापासून जेवण बनवण्यात आणि लोकांना ते खाऊ घालण्यात त्यांना फार रस. लग्नानंतर जेव्हा गीतकार आणि निर्माते आर. डी. बर्मन त्यांच्या घरी यायचे तेव्हा त्या स्वत: शेफसोबत काहीतरी खास बनवू पाहायच्या. आशा भोसले एकदा 'इंडियन आयडॉल १२' मध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. तिथे त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, आशा ताईंना घरी पाहुणे आलेले फार आवडायचे कारण यामुळे त्यांना स्वयंपाकघरात अधिक वेळ घालवायला मिळायचा. आशा भोसलेंची एक जुनी मुलाखतदेखी व्हायरल झाली होती ज्यात त्यांनी आर. डी. बर्मन यांना सांगितले होते, "तुम्हाला माहीत आहे, गाणे आणि स्वयंपाक करणे या माझ्या सर्वात आवडत्या गोष्टी आहेत. मी तुमच्यासाठी जेवण बनवते पण तुम्ही माझ्यासाठी गाणं तयार करत नाही.

दुबईत सुरु केलंय रेस्टाॅरंट

आशा भोसले यांनी आपली स्वयंपाकाची हिच आवड जपत दुबईत एक रेस्टाॅरंट ओपन केलं आहे. त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये तुम्हाला त्यांचे रेस्टाॅरंटच्या किचनमधील अनेक फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळतील. त्यांनी याविषयी एका मुलाखतीतही सांगितले की, त्या जेव्हा जेव्हा दुबईत त्यांच्या रेस्टाॅरंटला भेट देतात तेव्हा त्या स्वत: शेफ बनून कोणता ना कोणता पदार्थ तयार करतात.

लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड; अविनाश जाधव उपाध्यक्षपदी

'बाबा ऐकत नाहीत…', शरद पवारांना अॅडमिट केल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Viral Money Saving Trick: नोट खिशात ठेवण्याची 'ही' ट्रिक पाहिलीय का? पैसे पडणारच नाहीत, VIDEO व्हायरल

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?