(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम) 
बॉलीवूड

नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा, ‘मी पाठीशी आहे' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस!

स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा सांगणाऱ्या अनेक मालिका प्रेक्षकांनी पाहण्या आहेत. परंतु आता नवा कोरा चित्रपट नव्या युगातील प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २८ मार्च रोजी रिलीज होणार आहे.

सायली ससाणे

नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा सांगणारा ‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट येत्या २८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माचा अनोखा संगम प्रेक्षकांना अनुभव्हायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये तगडे मराठी कलाकार काम करताना दिसत आहेत.

या चित्रपटाबाबत दिग्दर्शक पराग अनिल सावंत म्हणाले की, "मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की, हा चित्रपट कोणीही बनवत नसून हा चित्रपट स्वतःहून घडला आहे. स्वामींनी तो आमच्याकडून घडवून घेतला आहे. आम्ही सगळे निमित्तमात्र आहोत. ‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट अनेक श्रद्धावान व्यक्तीच्या आयुष्यातील प्रेरणादायी अनुभवाचा प्रवास आहे. स्वामी समर्थांनी प्रत्येकाला दिलेला आधार, त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करून नक्कीच सकारात्मक ऊर्जा देईल.आम्हाला खात्री आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल." असे त्यांनी म्हटले आहे.

ऑफबीट प्रॉडक्शन, नित्य सेवा प्रॉडक्शन आणि वेरा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे कथा, संकलन आणि दिग्दर्शन पराग अनिल सावंत यांनी केल्या आहेत. तर, मयूर अर्जुन खरात, लक्ष्मीकांत गजानन कांबळे, ॲड. शुभांगी किशोर सोनवले, प्रमोद नंदकुमार मांडरे, शितल सोनावणे, ऋतुजा नरेंद्र कदम, अनिल गावंड आणि केतन कल्याणकर या स्वामींच्या सेवेकरांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. संजय नवगिरे, दिलीप परांजपे यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत.

‘मी पाठीशी आहे' चित्रपटातील गाण्यांना कबीर शाक्य यांना संगीत सेवा करण्याची संधी लाभली आहे. या चित्रपटात सक्षम कुलकर्णी, सतीश पुळेकर, अरुण नलावडे, सुहास परांजपे, वर्षा प्रभु, श्रीकांत पाटील, अश्विनी चवरे, प्रसाद सुर्वे, शितल सोनावणे, सूचित जाधव, श्रद्धा महाजन, राजवीर गायकवाड, वैष्णवी पोटे यांच्या प्रमुख भूमिका असून माधुरी पवार, संदेश जाधव आणि नूतन जयंत हे विशेष पाहुणे म्हणून झळकणार आहेत. तसेच या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट येत्या २८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका