(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)  
बॉलीवूड

रणबीर कपूरच्या 'Ramayana' चित्रपटात 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री, खास भूमिकेत झळकणार अभिनेता!

नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे 'भरत'ची भूमिका साकारत आहे. त्याच्याशिवाय आणखी कोणकोणते कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार जाणून घेऊयात.

सायली ससाणे

नितेश तिवारी यांचा 'रामायण' चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. अलिकडेच रणबीर कपूर आणि इतर कलाकारांनी पहिल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. रामायणचा फर्स्ट लूक व्हिडिओ देखील निर्मात्यांनी रिलीज केला आहे. चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या बहुतेक कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत. आता बातमी अशी आहे की, रणबीर कपूरचा धाकटा भाऊ भरतसाठी मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेला कास्ट करण्यात आले आहे. अभिनेत्याने स्वतः एका मुलाखतीत याची पुष्टी केली आहे. चला तर मग जाणून घेऊ आदिनाथ काय म्हणाला...

रामायणातील 'भरत' च्या भूमिकेत दिसणार आदिनाथ कोठारे

१३ मे १९८४ रोजी मुंबईत जन्मलेले आदिनाथ कोठारे हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहेत, ज्याने रणवीर सिंगच्या '८३' या क्रीडा-नाटक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आदिनाथ ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने केवळ अभिनयातच नशीब आजमावले नाही तर दिग्दर्शनातही प्रभुत्व मिळवले आहे. तसेच अभिनेत्याची ही खास भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

आदिनाथ कोठारेचे चित्रपट

आदिनाथने बालकलाकार म्हणून 'माझा छकुला' चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तो 'पानी', 'पछाडलेला', 'चंद्रमुखी', 'इश्क वाला लव्ह' आणि 'चिमणी पाखर' या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्याने 'परस्पेक्टिव' आणि 'झपाटलेला 2' सारखे चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत. तसेच अभिनेत्याचा नुकताच 'पाणी' चित्रपट चर्चेत होता. ज्याला भरपूर अवॉर्ड्स मिळाले आहेत.

रामायणात भरतची भूमिका साकारणार

बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आदिनाथ कोठारेने नितेश तिवारी यांच्या रामायणात भरतची भूमिका साकारत असल्याची पुष्टी केली. शूटिंगचा अनुभव सांगताना अभिनेत्याने सांगितले की, रामायण सारख्या चित्रपटांमध्ये काम करणे त्याच्यासाठी खूप मोठे आणि अनोखे काम आहे. या चित्रपटातून त्याला खूप काही शिकायला मिळाले आहे. आदिनाथने असेही सांगितले की नितेश तिवारी यांच्या रामायणात त्यांची एन्ट्री मुकेश छाब्रा यांच्यामुळे झाली आहे.

रामायणातील संपूर्ण स्टारकास्ट

नितेश तिवारी यांच्या रामायणातील जवळजवळ सर्व मुख्य पात्रांसाठी स्टार्सनी एन्ट्री केली आहे. रणबीर कपूर (श्री राम), साई पल्लवी (माता सीता) आणि यश (रावण) व्यतिरिक्त, सनी देओल हनुमानाची भूमिका साकारत आहे. रवी दुबे लक्ष्मणची भूमिका साकारणार आहेत, अरुण गोविल राजा दशरथ, लारा दत्ता कैकेयी, काजल अग्रवाल मंदोदरी, इंदिरा कृष्णन कौशल्या, शीबा चड्ढा मंथरा, कुणाल कपूर इंद्र देव आणि रकुल प्रीत सिंह शूर्पणखा यांची भूमिका साकारणार आहेत.

सिम ॲक्टिव ठेवण्यासाठी हे आहेत BSNL चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स! किंमत केवळ 99 रुपयांपासून सुरु; वाचा संपूर्ण यादी

महिलांच्या आरोग्यासाठी वरदान वरदान ठरतात 'हे' पदार्थ, रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहण्यासोबतच हृदयाला होतील फायदे

NSE Global Ranking : सांगता काय? भारतीय शेअर बाजाराचा जागतिक डंका! NSE बनले जगातील तिसरे सर्वात मोठे एक्सचेंज

Viral news: फक्त नाव विचारलं अन् तिच्यासाठी गाणंच बनवलं! लखनऊच्या कॅब ड्रायव्हरने जिंकलं रशियन तरुणीचं मन

शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! काल गोळीबार अन् हल्ल्याचा थरार अन् आज पुन्हा धमकीचा मेल