महाकुंभमेळ्यात 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने केलं शाही स्नान; म्हणाला "जोवर तो बोलवत नाही तोवर..." 
सिनेमा

महाकुंभमेळ्यात 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने केलं शाही स्नान; म्हणाला "जोवर तो बोलवत नाही तोवर..."

प्रयागराजमध्ये सोमवारी झालेल्या महाकुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेता सौरभ चौघुलेनेही हजेरी लावली होती. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत थोडक्यात आपला अनुभव शेअर केला आहे.

चेतन बोडके

हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्व असलेल्या महाकुंभमेळ्याला प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आहे. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात फक्त देशातूनच नाही तर जगभरातीलही लोकं गंगेत स्नान करण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे १४४ वर्षांनी महाकुंभमेळ्याचा योग जुळून आलाय. थेट पुढच्या २२ व्या शतकातच हा महाकुंभमेळा होणार आहे. त्यामुळे या कुंभमेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भारतातूनच नाही तर जगभरातून साधु-संत, भाविक येत आहेत. पौष पौर्णिमा निमित्त सोमवारी पहिलं शाही स्नान पार पडलं. पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर लोटणार आहे.

प्रयागराजमध्ये सोमवारी झालेल्या महाकुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेता सौरभ चौघुलेनेही हजेरी लावली होती. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत थोडक्यात आपला अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनही देत खास व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन दिले की,

"अचानक जुना मित्र कुंभला जातोय असं सांगतो काय!! त्याच्या ग्रुप मधला एक मेंबर कॅन्सल होतो काय!! आणि शेवटच्या क्षणाला माझं कुंभ मेळाला जायचं ठरतं काय!! निव्वळ योगायोग असे म्हणतात जोवर तो बोलवत नाही तोवर आपलं त्याला भेटणं होत नाही. असच काहीसं हे एक, १४४ वर्षानंतर येणाऱ्या महा कुंभमेळा, असं म्हणतात तीन पिढ्या नंतर एका पिढीला हा योग मिळतो. आणि मला तो मिळाला. देवाचे खूप खूप आभार. धर्म, ज्ञान आणि नवनवीन व्यक्तींची भेट खरंच खूप काही शिकवून जातं. || हर हर गंगे, हर हर महादेव ||"

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता ऐन थंडीच्या कडाक्यात नदीमध्ये शाहीस्नान करताना दिसत आहे. अंगावर उपरणं घालून अभिनेत्याने नदीमध्ये शाहीस्नान केलेलं दिसत आहे. अभिनेत्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अनेक चाहत्यांनी अभिनेत्याचं "हर हर महादेव..." म्हणत कौतुक केलं आहे. तर काहींनी "हर हर गंगे...", "तुम्हे वहाका बुलाया था... हर हर महादेव..." अशा कमेंट्स अभिनेत्याच्या व्हिडिओवर केल्या आहेत.

'बाबा ऐकत नाहीत…', शरद पवारांना अॅडमिट केल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Viral Money Saving Trick: नोट खिशात ठेवण्याची 'ही' ट्रिक पाहिलीय का? पैसे पडणारच नाहीत, VIDEO व्हायरल

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?

Baba Aparajith Retirement: CSK च्या 'या' खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPL 2027 ऑक्शनपूर्वी घेतला मोठा निर्णय