(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)  
मराठी सिनेमा

‘सुपर डुपर’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; तिन्ही पिढ्यांना एकत्र आणणारा फॅमिली एंटरटेनर चित्रपट

‘सुपर डुपर’ हा मराठी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसेच बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.

सायली ससाणे
  • ‘सुपर डुपर’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला
  • तिन्ही पिढ्यांना एकत्र आणणारा कौटुंबिक चित्रपट
  • ‘सुपर डुपर’ ठरली प्रेक्षकांची पहिली पसंत

सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘सुपर डुपर’ या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. दमदार कथानक, कलाकारांची प्रभावी कामगिरी आणि मनाला भिडणारी मांडणी यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूडमधील मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा असतानाही ‘सुपर डुपर’ने आपली वेगळी छाप निर्माण केली असून, प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्राधान्य दिले आहे. हीच बाब त्याच्या यशाची खरी पावती ठरत आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरत आहेत. “आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतो, पण ‘सुपर डुपर’ हा असा चित्रपट आहे जो तिन्ही पिढ्या एकत्र बसून आनंदाने पाहू शकतात,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जोडणारा, हसवणारा आणि तितकाच भावूक करणारा हा चित्रपट असल्यामुळे चित्रपटगृहांमध्ये कौटुंबिक प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची सार्वत्रिक अपील. फक्त मराठीच नव्हे, तर अमराठी प्रेक्षकांनाही ‘सुपर डुपर’ आकर्षित करत आहे. भाषेच्या पलीकडे जाऊन या चित्रपटाची कथा प्रत्येकाच्या मनात घर करत आहे. चित्रपटातील प्रसंग, संवाद आणि संगीत यामुळे प्रेक्षकांचा अनुभव अधिक समृद्ध होत असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे.

या प्रचंड प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, “प्रेक्षकांनी इतक्या प्रेमाने चित्रपट स्वीकारला, ही आमच्यासाठी अतिशय समाधान देणारी गोष्ट आहे. आम्ही असा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला जो कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भावेल, त्यांना एकत्र आणेल आणि हसवतानाच भावूकही करेल. प्रेक्षकांना थिएटरमध्ये एकत्र बसून चित्रपटाचा आनंद घेताना पाहणे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणे यापेक्षा मोठे यश आमच्यासाठी काहीच नाही.”

तर भावेश जानवलेकर यांनीही चित्रपटाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “'सुपर डुपर'ला मिळणारा प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक सहकुटुंब चित्रपटगृहात येत आहेत, हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी आशादायी चित्र आहे. बऱ्याच दिवसांनी खऱ्या अर्थाने एक फॅमिली फिल्म आली असून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे.”

झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ या चित्रपटात निर्मिती सावंत, ललित प्रभाकर, विदुला चौगुले, शशांक शेंडे, हृषीकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके आणि प्रतीक्षा कोते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले असून, निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे आहेत. तसेच उमेश कुमार बन्सल आणि भावेश जानवलेकर हे प्रस्तुतकर्ता आहेत. छायांकनाची जबाबदारी संजय जाधव यांनी सांभाळली आहे.

एकूणच, हास्य, भावना आणि कौटुंबिक नातेसंबंधांचा सुंदर संगम असलेला ‘सुपर डुपर’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कुटुंबासोबत पाहण्यासारखा दर्जेदार मनोरंजन देणारा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मोठा यशस्वी टप्पा ठरत आहे.

Delhi Jama Masjid : दिल्लीतील जामा मशिद पोलीस ठाण्यात पाच पोलिसांवर चाकूने हल्ला; आरोपीच्या पायावर गोळी झाडत केली अटक

Gold Imports Drop : PM Modi यांच्या आवाहनाचा मोठा परिणाम? सोन्याच्या आयातीत तब्बल 40 % घट; 7 महिन्यांत 1.53 लाख कोटींची बचत

Maharashtra Recruitment Exam: पेपरफुटी करणाऱ्यांना १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास; भरती परीक्षांसाठी सरकारचा कठोर ॲक्शन प्लॅन

Leopard Attack in Assam:बिबट्याचा थरारक हल्ला कॅमेऱ्यात कैद; वनविभागाच्या बचावकार्यात मोठी दुर्घटना

IND A vs UAE : गोलंदाजांना सुर गवसेना, युएईचं भारताला 250 धावांचं आव्हान