मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या 'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेला दिला पाठिंबा (फोटो - सोशल मीडिया)  
राजकारण

‘नेते जनतेत दिसले पाहिजेत, बेकायदा होर्डिंगवर नाही’; पुण्याच्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

पुणे महापालिकेच्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. माझ्या नावाचेही बेकायदा होर्डिंग लागल्यास पुरस्कारांच्या यादीत नाव टाका, असे त्यांनी म्हटले.

प्रीति माने
  • पुण्याच्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्येही कारवाईचे दिले निर्देश

  • तर पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा - फडणवीस

Pune News : पुणे : शहर फ्लेक्समुक्त करण्यासाठी पुणे महापालिकेने ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम सुरू केली. यामध्ये थेट सत्ताधारी नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने ही मोहिम चर्चेत आली आहे. ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ जाहीर करत स्थायी समिती अध्यक्ष व महापौरांनाच दणका दिला आहे. पुणे महापालिकेच्या या मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पुण्यातील या फ्लेक्सविरोधी कारवाईचे कौतुक करत त्यांचा स्वतःचा फ्लेक्स असेल तरी मुख्यमंत्र्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यास सांगितले आहे.

फडणवीस यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “पुण्यात सध्या अतिक्रमणाविरोधात आणि विशेषत: अवैध होर्डिंगविरोधात कारवाई सुरु आहे. मी पुणे महापालिका प्रशासनाचे अतिशय मनापासून कौतूक आणि अभिनंदन करतो. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी, पायी चालण्यासाठी जागा असल्या पाहिजेत. शेवटी नियम हे काही केवळ जीआर किंवा शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचे सुद्धा असतात. याचा हेतू सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच असतो...”

पुणे शहर विद्रूपीकरण पुरस्कारात सत्ताधारी पक्षाचे नेते अव्वल! स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’ किताब

पुढे त्यांनी लिहिले, “बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्यात नाही, सर्वत्रच मोठी समस्या आहे. यावर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. त्यातही पुण्याने जी अभिनव आणि अस्सल ‘पुणेरी’ धाटणीतील संकल्पना स्वीकारली, त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे. पुणे प्रशासनाला मी सांगेन.... उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा!”

पुणे महापालिकेचा थेट महापौरांनाच टोला! मंजुषा नागपुरेंच्या फ्लेक्सचा फोटो शेअर करत म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे लिहिले, “आता येणार्‍या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन आहे, तेथेही आता बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरु होईल. नागपूर प्रशासनाने आतापासून जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही.”

पुणे महापालिकेने ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम का सुरू केली?

पुणे शहरातील अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंगमुळे होणारे विद्रूपीकरण रोखण्यासाठी तसेच नागरिकांना रस्ते आणि पादचारी मार्गांचा योग्य वापर करता यावा, यासाठी महापालिकेने ही मोहीम सुरू केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या मोहिमेबाबत काय म्हटले?

देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या कारवाईचे कौतुक केले. तसेच आपल्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर शहर विद्रूपीकरण पुरस्कारांच्या यादीत आपलेही नाव जाहीर करावे, असे त्यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर प्रशासनाला काय आवाहन केले?

नागपूरमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी प्रशासनाला आतापासूनच जनजागृती करण्याचे आवाहन केले. शहरात बेकायदा होर्डिंग लागणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले.

Traffic Police Viral Video: ‘प्रत्येक गणवेशामागे एक माणूस’ झाडाखाली बसून जेवण करणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

Gujarat ATS : गुजरातमध्ये जैश-ए-मोहम्मदचा संशयित दहशतवादी जेरबंद; AK-47 आणि 23 काडतुसे जप्त

Winter Health Tips: हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवायचीये? मग आहारात आवर्जून खा 'ही' हंगामी फळे-भाज्या; शरीर राहील फिट

आकाशात तिरंग्याची शान अन् Sukhoi च्या गर्जनेने पुणे दुमदुमले; अवकाशात दिसली Indian Air Force ची ताकद

स्मार्ट बँडमध्ये स्क्रीनच नाही? तरीही मोजतो Steps आणि Heart Rate!