राहुल गांधींना काळे फासण्याची ठाकरे गटाच्या नेत्याची थेट धमकीच ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)  
राजकारण

राहुल गांधींना काळे फासण्याची ठाकरे गटाच्या नेत्याकडूनच थेट धमकी; दगडफेक करण्याचेही म्हटलं...

राहुल गांधी यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. इतकेच नाहीतर राहुल गांधी यांना काळे फासणार आहे. जर त्यांना काळे फासता आले नाहीतर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू', असेही बाळा दराडे यांनी म्हटले आहे.

कृपादान आवळे

नाशिक : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत विधान केले होते. त्यावरून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उप महानगरप्रमुख बाळा दराडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी राहुल गांधींना काळे फासण्याची थेट धमकीच दिली आहे.

एका प्रकरणाशी संबंधित राहुल गांधी हे नाशिकच्या कोर्टात हजर राहणार आहेत. तेव्हा त्यांना काळे फासण्याची भूमिका ठाकरे गटाच्या नेत्याने घेतली आहे. 'राहुल गांधी यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. इतकेच नाहीतर राहुल गांधी यांना काळे फासणार आहे. जर त्यांना काळे फासता आले नाहीतर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू', असेही बाळा दराडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बाळा दराडे यांच्या विधानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही समाचार घेतला. 'राहुल गांधींनी सावरकरांना शिवीगाळ किंवा अपशब्द वापरले नाहीत. अरूण शौरींनीही जगापुढे इतिहास मांडला आहे. पण, सध्याची परिस्थिती 'खोटं बोला पण रेटून बोला' अशी आहे. अपशब्द कोणीही वापरले नाहीत. चुकीचे विधान केले जात आहे'.

दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्याकडून जर अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही त्याला भीक घालणार नाही. त्याला योग्य उत्तर देऊ, असेही प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटले आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका