उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत डिलिमिटेशनवर व्यक्त केला संताप (फोटो - सोशल मीडिया)  
राजकारण

ठाकरे गटाचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी मांडलं लोकसभेच्या जागांचं गणित, म्हणाले, "UPपेक्षा महाराष्ट्र..."

डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून भाजपला सोयीचे मतदारसंघ तयार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांमध्ये होणाऱ्या संभाव्य वाढीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

प्रीति माने
  • उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

  • डिमिलिटेशन विधेयकावरून मांडलं राजकीय गणित

  • उद्धव ठाकरेंनी सांगितले महाराष्ट्र व उत्तर प्रदेशच्या जागांचे राजकारण

Uddhav Thackeray Press Conference : मुंबई : डिलिमिटेशन विधेयकाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाने तीव्र संताप व्यक्त केला. यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत डिलिमिटेशन विधेयकाला कडक शब्दांत विरोध केला. मतदारसंघाच्या फेररचनेमुळे सोयीस्कर मतदारसंघ केले जाणार असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, हे विधेयक दुर्दैवाने मंजूर झालं तर त्याचा त्रास पूर्ण देशाला होणार आहे. मलाही या विधेयकाल पाठिंबा देता आला असता पण मला पक्षाच्या हितापेक्षा महाराष्ट्र आणि देशाचं हित याचा जास्त विचार करतो. सीमांकन ठरवण्याचा ज्या समितीला अधिकार देण्यात आला आहे, ती समितीच आम्हाला मान्य नाही. त्यांच्यवर मतचोरीचा आरोप झालेला आहे आणि त्यांना काढून टाकावं अशी मागणी होत असताना त्याच ज्ञानेश कुमार यांन या समितीमध्ये ठेवण्यात आले आहे.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, "समिती हा फक्त एक फास आहे, कारण काय करायचं आहे याचा प्लॅन भाजपकडे तयार आहे. ही भाजपची स्क्रीप्ट जनतेसमोर आणायची, हेच फक्त समितीचे काम आहे. या समितीमध्ये विरोधातील कोणी नाही उलट ज्यांच्यावर मतचोरीचा आरोप आहे, त्यांना घेऊनच समिती तयार केली जात आहे. लोकसभेचे जागा वाढवत असताना राज्यसभेच्या जागा वाढवल्या जाणार आहेत का? अजून त्याबद्दल सांगितलेले नाही."

राहुल गांधी करणार शरद पवारांची मनधरणी; ब्रीच कॅन्डी रूग्णालयात घेणार भेट

उद्धव ठाकरे म्हणाले, "सीमांकनचा चांगला अनुभव हा आम्ही शिवसेनेने २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये घेतला आहे. मतदार याद्यांचा अभ्यास करून, त्यानुसार मतदारसंघ तयार करण्याचा प्लॅन आहे. विरोधकांना आणि त्यांना पडणाऱ्या मतांची यादी त्यांच्याकडे तयार आहे. त्यानुसार मतदारसंघ तयार करून कितीही प्रचार केला तरी त्यांचीच सत्ता येईल, अशी सोय करणार आहेत. हा मोठ्या प्रमाणात आणि उघडपणे मतचोरीचाच एक विषय आहे."

राहुल गांधींचा चैन्नई दौरा यशस्वी? एम. के. स्टॅलिन यांनी भेटीनंतर सूचक पोस्ट केल्याने चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे म्हणाले, "या विधेयकावरून महाराष्ट्राच्या ४८ जागांवरून ७२ जागा होणार आहेत. पण आता आपल्यामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये ३२ जागांचा फरक आहे. पण ५० टक्क्यांची वाढ झाल्यानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये ४८ जागांचा फरक होणार आहे. ही बाब कोणाच्या लक्षात येते का नाही, माहीत नाही. संपूर्ण महाराष्ट्र हा उत्तर प्रदेशमध्ये असल्याप्रमाणे वाटतोय. तसेच तमिळनाडू व उत्तर प्रदेशमध्ये सध्या ४१ जागांचा फरक आहे तो ६१ जागांचा फरक होईल. यामुळे २० जागांचा फरक वाढणार आहे."

दाढीच्या बहाण्याने कात्री घेतली अन् मेहुण्याचा जीव घेतला; आरोपीला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Youth Artistic Gymnastics : जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत शुभदा भाबरेची सुवर्णभरारी; महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद, पश्चिम बंगालचेही वर्चस्व

मध्यरात्री दीड वाजता रक्ताचा सडा! आईला त्रास देणाऱ्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीचे वार अन्...

Home tips: नवीन आठवड्याची सुरुवात करा फ्रेश मूडमध्ये! रविवारी करा 'Sunday Reset', घरासोबत स्वतःचीही घ्या काळजी

बोरांसाठी चिमुरडीवर क्रूरतेचा कळस! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची चक्रे फिरली...