फोटो सौजन्य- सोशल मीडिया  women
नवराष्ट्र विशेष

Women Safety & Rights: आज महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन; जाणून घ्या २५ नोव्हेंबरचा इतिहास...

Women Safety & Rights: महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिवस महिलांवर होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आणि भावनिक अत्याचारांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचा अंत करण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी साजरा केला जातो.

श्रेया देशमुख

MHADA News: वाढीव शुल्क आकारणाऱ्या विकासकाला दणका! म्हाडाच्या लोकशाही दिनात नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारणWomen Safety & Rights: आज महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांवर होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आणि भावनिक अत्याचारांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचा अंत करण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी साजरा केला जातो.

महिलांविरुद्ध हिंसाचार ही जागतिक समस्या आहे, जी केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नुकसान पोहोचवत नाही, तर समाजाच्या प्रगतीलाही अडथळा ठरते. घरगुती हिंसा, मानवी तस्करी, लैंगिक शोषण आणि वांशिक भेदभाव यांसारख्या समस्यांमुळे महिला अनेक आव्हानांना सामोऱ्या जातात.

हिंसाचारमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येकाने महिलांचा सन्मान राखणे, समानता प्रस्थापित करणे, आणि त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे.

२५ नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1664 : छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली.

  • 1922 : फ्रेडरिक बँटिंग यांनी मधुमेहासाठी इन्सुलिनचा शोध जाहीर केला.

  • 1948 : नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.

  • 1975 : सुरीनामला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • 1981 : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.

  • 1991 : कमल नारायण सिंह यांनी भारताचे 22 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.

  • 1994 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, कलकत्ता तर्फे राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • 1999 : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • 2000 : सितार वादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन सन्मान प्रदान केला.

२५ नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1841 : ‘आर्न्स्ट श्रोडर’ – जर्मन गणितज्ञ यांचा जन्म.

  • 1844 : ‘कार्ल बेंझ’ – मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1929)

  • 1872 : ‘कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर’ – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 ऑगस्ट 1948)

  • 1889 : ‘साधू वासवानी’ – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1966)

  • 1882 : ‘सावळाराम लक्ष्मण हळदणकर’ – मराठी चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 मे 1968)

  • 1898 : ‘देबाकी बोस’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.

  • 1921 : ‘भालचंद्र पेंढारकर’ – नटवर्य यांचा जन्म.

  • 1926 : ‘रंगनाथ मिश्रा’ – भारताचे 21 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 2012)

  • 1935 : ‘गोविंद सावंत’ – महाराष्ट्रीय हॉकीपटू यांचा जन्म.

  • 1937 : ‘साधू वासवानी’ – शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म.

  • 1939 : ‘उस्ताद रईस खान’ – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक यांचा जन्म.

  • 1952 : ‘इम्रान खान’ – पाकिस्तानचा क्रिकेटपटू यांचा जन्म.

  • 1972 : ‘दीपा मराठे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

  • 1983 : ‘झुलन गोस्वामी’ – भारतीय क्रिकेटर यांचा जन्म.

२५ नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1885 : ‘अल्फान्सो (बारावा)’ – स्पेनचा राजा यांचे निधन. (जन्म : 28 नोव्हेंबर 1857)

  • 1922 : ‘पांडुरंग दामोदर गुणे’ – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक यांचे निधन. (जन्म : 20 मे 1884)

  • 1960 : ‘अनंत सदाशिव अळतेकर’ – प्राच्यविद्यापंडित यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1898)

  • 1962 : ‘गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे’ – आधुनिक संतकवी यांचे निधन. (जन्म : 6 जानेवारी 1868)

  • 1974 : ‘उ. थांट’ – संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म : 22 जानेवारी 1909)

  • 1984 : ‘यशवंतराव चव्हाण’ – भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 12 मार्च 1913)

  • 1997 : ‘जवाहरलालजी दर्डा’ – लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी यांचे निधन.

  • 1997 : ‘हेस्टिंग्ज बांदा’ – मलावी देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 14 मे 1898)

  • 1998 : ‘परमेश्वर नारायण हक्सर’ – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 4 सप्टेंबर 1913 – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)

  • 2013 : ‘लीला पोतदार’ – बालसाहित्यिका यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1920)

  • 2014 : ‘सितारा देवी’ – भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर यांचे निधन. (जन्म : 8 नोव्हेंबर 1920)

  • 2016 : ‘फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ’ – क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 13 ऑगस्ट 1926)

उदगीरचे तरुण झाले देवदूत! पेटत्या एसटी बसमधून ३८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले

Airoli-Katai Highway: नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार जलद; दुहेरी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

भुशाच्या ढिगाऱ्याखाली सापडले सव्वा तीन कोटींचे घबाड; सशस्त्र दरोड्याचा अखेर छडा

Share Market Today: शेअर बाजारात काय घडणार? कोणते शेअर्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या सविस्तर

मटारची आवक वाढली, अन्य भाज्या मात्र कडाडल्या! नवी मुंबई बाजर समितीमध्ये भाव १२० रुपये प्रति किलोवरून ५० रुपयांपर्यंत घसरला