IND Vs NZ: दोन सामन्यांच्या सिरीजमधला भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना पूर्ण झाला. अखेरच्या दिवशी हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. दरम्यान शेवटच्या दिवशी मैदानावर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. अंशूल कंबोजच्या गोलंदाजीवर कर्णधार शुभमन गिलने डीआरएस घेतला होता. घेतलेला डीआरएस बरोबर असल्याने शुभमन गिलला आनंद झाला. तसेच आता त्याचा आनंदात डान्स करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी मैदानावर एक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला. शेवटच्या दिवशी दुसऱ्या सत्रात कर्णधार शुभमन गिलने डीआरएस न्यूझीलंडच्या फलंदाजाला महागात पडला आणि त्यानंतर गिलने व्यक्त केलेला आनंद सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वेलिंग्टनच्या मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली, तेव्हा न्यूझीलंडने आपल्या ४ विकेट्स गमावल्या होत्या. तेवढ्यातच न्यूझीलंडला पाचवा धक्का बसला आहे. गोलंदाज अंशूल कंबोजच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने टॉम ब्लंडलचा कॅच पकडला. भारताने आणि कंबोजने जोरदार अपील केले. मात्र अंपायरने त्याला नॉट आउट दिले.
अंपायरने नॉट आउट दिल्यावर कर्णधार शुभमन गिलने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. त्या डीआरएसमध्ये टॉम ब्लंडलच्या बॅटला बॉल लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यानंतर थर्ड अंपायरने टॉम ब्लंडलला आउट दिले. अचूक रिव्ह्यू घेतल्यानंतर निर्णय बरोबर ठरताच शुभमन गिलने आपला आनंद आणि उत्साह मैदानावरच साजरा केला.
अंपायरने नॉट आउट दिल्याने गिलने डीआरएस घेतला. काहीतरी आवाज आला आहे अशी चर्चा त्याने अन्य सहकाऱ्यांशी केली. त्याने लगेच डीआरएस घेतला. मात्र डीआरएसमध्ये फलंदाज आउट झाल्याचे दिसून आले. थर्ड अंपायरचा निर्णय आपल्या बाजूने यातच कर्णधार शुभमन गिलने आनंद व्यक्त केला. त्याने मैदानावरच डान्स करत आपला जलूसह साजरा केला. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.