IND A vs UAE : गोलंदाजांना सुर गवसेना, युएईचं भारताला 250 धावांचं आव्हान  IND A vs UAE : गोलंदाजांना सुर गवसेना, युएईचं भारताला 250 धावांचं आव्हान , (फोटो सौजन्य : एक्स)
Sports

IND A vs UAE : गोलंदाजांना सुर गवसेना, युएईचं भारताला 250 धावांचं आव्हान

IND A vs UAE : रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेत युएईने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर मोठ्या धावसंख्येचे आव्हान उभे केले. हरप्रीत सिंग भाटियाच्या दमदार खेळीने युएईचा डाव सावरला, तर भारताच्या अर्शद खानने चार विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली.

Rakesh Khedekar
  • सेमिफायनल गाठण्यासाठी विजय महत्त्वाचा

  • युएईचा डाव हरप्रीतने सावरला

  • भारताचा अर्शद खान चमकला

IND A vs UAE : दोहा येथे पार पडत असलेल्या आयसीसी चषक रायझिंग स्टार्सच्या सामन्यात युनायटेड अरब अमिरात (UAE) यांनी प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 8 बाद 150 धावांचे आव्हान दिले. युएईच्या वतीने हरप्रीत सिंग भाटीया याने 130 धावांची दमदार खेळी केली. याही सामन्यात भारताचे गोलंदाज म्हणावे तसे चालले नाहीत. त्यामुळे युएईला 200 धावांचा आकडा पार करता आला.

युएईचा डाव हरप्रीतने सावरला

तसं पाहता, भारताच्या वतीने चांगली सुरुवात झाली. भारताच्या गोलंदाजांनी सहाव्याच षटकात युएईला 20 धावांवर दोन धक्के दिले, मात्र येथून पुढे हरप्रीत सिंगची बॅट चालली. त्याने तिसऱ्या विकेटसाठी मोहम्मद शाहदाद (28) सोबत 71, तर एथन डिसोझा(25)सोबत चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली.

हरप्रीतने 144 चेंडूंत 12 चौकार व 4 षटकाराच्या मदतीने 130 धावा केल्या. तर कर्णधार बशील हमीदने 36 धावांचे योगदान दिले. त्यांनी संपूर्ण 50 षटक खेळत संघाच्या 8 बाद 259 धावा केल्या.

भारताचा अर्शद खान चमकला

या सामन्यात प्रिन्स यादवच्या जागी अर्शद खानला (43/4)संघात जागा देण्यात आली. या संधीचं त्यानं सोनं केलं. त्याने सलामीचा अंश टंडन (8) आणि यष्टीरक्षक अफताब आलम (2) यांना जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. तर खेळपट्टीवर जम बसवलेल्या हरप्रीतचा काटाही अर्शदनेच 47 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड करत काढला. त्याच्या एक चेंडूनंतर त्याने इब्रार अहमदला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले.

हर्षित राणा (63/1) याही सामन्यात महाग ठरला. त्याने जरी एक विकेट घेतला असले तरी त्याने सरासरी 6.30 च्या रनरेटने धावा दिल्या. त्याच्यानंतर हर्ष दुबे (28/7), शाहबाज अहमद (23/1), श्रेयांश शेगडे ( 48/1) प्रत्येकी एक विकेट मिळवला.

Anti Aging Serum: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचा वयस्कर दिसते? मग 'या' पद्धतीने करा ग्लिसरीनचा वापर

Rice Price Update : तांदळाच्या दराबाबत मोठी बातमी! सरकारने अचानक लावला 20% Tax; सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार?

EPF Rules Changes Proposal : PF मधून 90% रक्कम काढल्यास रिटायरमेंटला 27 लाखांचा फटका? नियमांमध्ये कोणत्या 2 मोठ्या बदलांचा प्रस्ताव

Priyansh Arya : प्रियांश आर्यने रचला इतिहास, भारताच्या वतीने टी-20 मध्ये सर्वात मोठी खेळी करणारा ठरला फलंदाज

Amravati News: कोसा रेशीम उद्योगाला दुष्काळाच्या झळा! टसर उद्योगाला ६० टक्क्यांपर्यंत फटका बसल्याचा अंदाज