नेपाळमध्ये टीम इंडिया घालणार धुमाकूळ
तीन टी-२० सामन्यांसाठी भारत A चा दौरा निश्चित
पाहा संपूर्ण शेड्यूल
India A tour of Nepal: भारत अ संघाचा रायझिंग स्टार्स आशिया कपमधील प्रवास संपुष्टात आला आहे. भारत अ आणि श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा धुव्वा उडवला. या पराभवामुळे टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
दरम्यान, भारतीय अ संघ पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी नेपाळला जाणार आहे. ही आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग असणार नाही. परंतु, हे सामने रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील मालिक कधीपासून खेळली जाणार, वेळापत्रक जाणून घेऊयात.
भारताचा 'अ' संघ नेपाळविरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहे. मालिकेतीस पहिला सामना ९ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. तर, दुसरा सामना ११ डिसेंबर रोजी आणि तिसरा सामना १३ डिसेंबर रोजी खेळला जाईल. हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९:४५ वाजता सुरू होतील. म्हणजेच हे सामने दिवसा खेळले जातील. या मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. तिलक वर्मा कर्णधार म्हणून कायम राहणर की नवीन कर्णधाराची नियुक्ती केली जाईल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
आशिया कप रायझिंग स्टार्स सामन्यात युएईविरुद्ध द्विशतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला या मालिकेत देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. नेपाळविरुद्धच्या एकदिवसीय सामनय्ता वैभवने ५२ चेंडूमध्ये २०४ धावांची वादळी खेळी करुन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यामुळे नेपाळविरुद्ध संधी मिळाल्यास वैभवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. मालिका आता जवळ आल्याने संघाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
भारताचा वरिष्ठ संघ डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. १३ डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होईल. तिसरा आणि अंतिम सामना १९ डिसेंबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर तीन टी-२० सामनेही होतील.