India defeat China 3-1 to wins Asian Champions Trophy 
Sports

चक दे इंडिया! भारताच्या वाघिणींचा 'विजयी चौकार'; चीनला लोळवत चौथ्यांदा पटकावला Asian Champions Trophy चा किताब

India defeat China 3-1 to wins Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनला ३-१ ने पराभूत करून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले.

Priyanka Mundinkeri
  • भारतीय महिला हॉकी संघाचा मैदानात दणका

  • चीनला ३-१ ने लोळवले

  • सलग तिसऱ्यांदा जिंकली आशियाई ट्रॉफी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ चे विजतेपद पटकावले . शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी भोपाळ येथे महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि चीन यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने शानदार कामगिरी करत चीनचा ३-१ ने दणदणीत पराभव केला.

या विजयासह भारताने चौथ्यांदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले. चार वेळा विजेतेपद पटकावत भारत या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. इतकेच नाही, तर हे भारताचे सलग तिसरे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद आहे. यापूर्वी भारतीय संघाने २०१६, २०२३ आणि २०२४ मध्ये विजेतेपद पटकावले होते.

दुसऱ्या हाफमध्ये दीपिकाने सामन्याचे चित्रच पालटले

भोपाळ येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात खेळल्या गेलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्यात, चीनने आक्रमक खेळ करत भारतीय डिफेन्सवर दबाव आणला. २५ व्या मिनिटाला चेन युजूनने गोल करून चीनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात, भारतीय संघाला चीनच्या मजबूत डिफेन्सपुढे संघर्ष करावा लागला. मात्र, दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने आक्रमक पवित्रा घेत जोरदार कमबॅक केले. ३८ व्या मिनिटाला, दीपिकाने पेनल्टी कॉर्नरवर एक शानदार गोल करून भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

मग, ४२ व्या मिनिटाला, इशिकाने उत्कृष्ट समन्वय दाखवत गोल केला. नेहा गोयल आणि नवनीत कौर यांच्या अप्रतिम पासच्या मदतीने इशिकाने चेंडू गोलपोस्टमध्ये मारून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. अवघ्या एका मिनिटानंतर, ४३ व्या मिनिटाला, दीपिकाने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. पेनल्टी कॉर्नरवर अचूक फटका मारून तिने आपला दुसरा गोल केला आणि भारताची आघाडी ३-१ अशी वाढवली. यानंतर, भारतीय खेळाडूंनी आपल्या मजबूत डिफेन्सच्या जोरावर चीनला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही आणि दणदणीत विजयासह विजेतेपद पटकावले.

स्पर्धेत अजिंक्य राहून पटकावले विजेतेपद

भारतीय महिला हॉकी संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत एकही सामना न हरता विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यापूर्वी, भारताने साखळी फेरीत चीनला ६-२ ने पराभूत केले होते. त्यानंतर, संघाने अंतिम सामन्यात पुन्हा चीनला हरवून विजेतेपद मिळवले. यापूर्वी, भारतीय संघाने २०२३ मध्ये रांची आणि २०२४ मध्ये राजगीर येथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

आता, २०२६ मध्ये सलग तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकून भारताने स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारतीय संघाच्या विजेतेपदाच्या विजयात दीपिकाने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने संपूर्ण स्पर्धेत एकूण १० गोल करून सर्वाधिक गोल करणारी खेळाडू होण्याचा मान मिळवला. तिच्या १० गोलांपैकी नऊ गोल पेनल्टी कॉर्नरमधून आणि एक गोल मैदानावरून केला होता. तसेच, २५ सामन्यांमध्ये ४१ गोल ​​करून ती यावर्षी सर्वाधिक गोल करणारी भारतीय खेळाडू ठरली.

FUEL Social Stock Exchange: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! 'फ्युएल'च्या माध्यमातून शिष्यवृत्ती आणि मोफत MBA ची घोषणा

राहुल गांधी करणार शरद पवारांची मनधरणी; ब्रीच कॅन्डी रूग्णालयात घेणार भेट

India Denmark : भारत आणि डेन्मार्कची महास्ट्रॅटेजिक युती; संरक्षण, AI अन् हरित ऊर्जेत मोठी झेप, भारतीयांसाठी रोजगाराच्या नव्या संधी

Moradabad Viral Video: प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात! महामार्गावर दोन कारमधून तरुणांचे धोकादायक स्टंट

अपघात की कंत्राटदाराचा निष्काळजीपणा? नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू