Khadakwasla Ultra Marathon 
Sports

Ultra Marathon: खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये महिला धावपटूंचा डंका; डॉ. अश्विनी जाधव यांना ७५ किमीमध्ये पोडियम

Khadakwasla Ultra Marathon: खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये बुलढाण्याच्या ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स व रणरागिणी महिला ग्रुपच्या धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Priyanka Mundinkeri
  • अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये बुलढाण्याच्या धावपटूंची बाजी

  • अश्विनी जाधव यांचे ७५ किमीमध्ये यश

  • महिला धावपटूंची चमकदार कामगिरी

बुलढाणा: पुणे येथील खडकवासला येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत बुलढाण्यातील ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स ग्रुप आणि रणरागिणी महिला ग्रुपच्या धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत बुलढाण्याचा नावलौकिक वाढविला. या स्पर्धेत बुलढाण्याच्या महिला धावपटूंनी विशेष चमक दाखवत पोडियम मिळविले, तर पुरुष व महिला अशा एकूण अनेक धावपटूंनी विविध अंतरांच्या स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या.

या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरल्या त्या बुलढाण्याच्या महिला धावपटू. डॉ. अश्विनी जाधव यांनी तब्बल ७५ किलोमीटर अंतराची अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करून पोडियम स्थान पटकावले आणि बक्षीस मिळविले. त्याचप्रमाणे डॉ. विद्या घोंगटे आणि मंगल गवई यांनी २५ किलोमीटर गटात पोडियम मिळवून बुलढाण्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला.

५५ किलोमीटर गटात गजानन पाटील, पांडुरंग नाफडे, अॅड. शरद राखोंडे, गजानन वराडे, अरुण सौभागे आणि रवींद्र पाटील यांनी अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने ५५ किलोमीटर अंतराची खडतर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. धावपटूंनी घडविले. ३५ किलोमीटर गटात गजानन डुकरे, उमेश गाढवे, सुरेश शिंबरे व निशांत उबरहंडे व विद्या सानप यांनी मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. तर २५ किलोमीटर गटात डॉ. विद्या घोंगटे, डॉ. वर्षा तांगडे, मंगल गवई, वर्षा हिवाळे, किरण लव्हाळे, संजीवनी कोलते, सीमा डुकरे, मनीषा जाधव, नंदा चाटे, शीतल मोगल, अनिता कापरे आणि प्रतिभा पायघन यांनी यशस्वी सहभाग नोंदवत २५ किलोमीटर अंतर पूर्ण केले.

महिला धावपटूंचा सहभाग प्रेरणादायी

विशेष म्हणजे, महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवून केवळ सहभागापुरते मर्यादित न राहता पोडियमपर्यंत मजल मारली. डॉ. अश्विनी जाधव यांची ७५ किलोमीटरमधील कामगिरी आणि डॉ. विद्या घोंगटे व मंगला गवई यांचे २५ किलोमीटरमधील यश हे इतर महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. बुलढाण्यात गेल्या काही वर्षांपासून धावणे, मॅरेथॉन आणि आरोग्यविषयक उपक्रमांची चळवळ वाढत आहे.

ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स ग्रुप आणि रणरागिणी महिला ग्रुपच्या माध्यमातून नियमित सराव, शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्य जागृती आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन दिले जात आहे. याच सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिविव खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉनमधील या यशस्वी कामगिरीतून दिसून आले. या सर्व धावपटूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर बुलढाण्याचे नाव राज्याच्या क्रीडा क्षेत्रात उंचावले.

Toyota Drum Tao India Tour 2026 : टोयोटाकडून ड्रम ताओच्या दुसऱ्या भारत दौऱ्याची घोषणा; २१ शहरांत रंगणार जपानी ढोलवादन

Buldhana: बुलढाण्यात पाणीटंचाईचे भीषण वास्तव; रब्बी पेरणी क्षेत्रात ७७ टक्क्यांची घट, बोअरवेल-विहिरींसाठी शेतकऱ्यांची धावपळ

Sharad Pawar in NDA : '१५ डिसेंबरनंतर शरद पवार NDA मध्ये सहभागी होतील...'; बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट

Satara News : वाईत चेलाराम बेल एअर हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; हृदयरोग, मधुमेहाच्या तपासण्या

Koregaon Nagar Panchayat Election : राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीवर भगवा फडकविणार; शंभूराज देसाईंचा निर्धार