फोटो सौजन्य - सोशल मिडिया 
Sports

IND vs SA सामन्यानंतर प्लाईटला उशीर झाल्यानंतर मोहम्मद सिराजने संतापला! सोशल मिडियावर व्यक्त केला राग

सामन्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज संतापाच्या भरात निघाला. तथापि, विमानाला उशीर होत राहिला आणि चार तास उलटूनही कोणतीही अपडेट मिळाली नाही. यामुळे सिराज संतप्त झाला त्याने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला.

शुभांगी मेरे

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर खेळवण्यात आला. आफ्रिकन संघाने ४०८ धावांनी विजय मिळवत मालिका २-० अशी जिंकली. आता भारताचा संघ हा एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, सामन्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज संतापाच्या भरात निघाला. गुवाहाटी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेला सिराज सामन्यानंतर हैदराबादला घरी परतू इच्छित होता.

यासाठी एअर इंडियाचे एक विमान बुक करण्यात आले होते, जे संध्याकाळी ७:२५ वाजता निघणार होते. तथापि, विमानाला उशीर होत राहिला आणि चार तास उलटूनही कोणतीही अपडेट मिळाली नाही. यामुळे सिराज संतप्त झाला आणि त्याने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. गुरुवारी, मोहम्मद सिराज यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केले, "गुवाहाटीहून हैदराबादला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट IX 2884 सकाळी 7:25 वाजता निघणार होती.

तथापि, एअरलाइनकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही आणि वारंवार कॉल करूनही, त्यांनी योग्य कारणाशिवाय फ्लाइटला उशीर केला आहे. हे खरोखर निराशाजनक आहे आणि प्रत्येक प्रवासी हेच विचारतो. फ्लाइटला चार तास उशीर झाला आहे आणि आम्ही अद्याप कोणतेही अपडेट न मिळाल्याने अडकलो आहोत. एअरलाइनचा सर्वात वाईट अनुभव. जोपर्यंत ते कारवाई करत नाहीत तोपर्यंत मी खरोखरच कोणालाही या फ्लाइटची शिफारस करणार नाही."

मोहम्मद सिराज यांनी उड्डाणाच्या विलंबाबद्दल व्यक्त केलेल्या संतापानंतर, एअर इंडियानेही प्रतिक्रिया दिली. सिराजच्या पोस्टला उत्तर देताना, एअरलाइनने सांगितले की गुवाहाटी ते हैदराबादला जाणारी त्यांची फ्लाइट, IX 2884, ऑपरेशनल कारणांमुळे रद्द करण्यात आली आहे.

कसोटी मालिकेच्या समाप्तीनंतर, भारत आणि दक्षिण आफ्रिका ३० नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळतील. तथापि, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी मोहम्मद सिराज टीम इंडियाचा भाग नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सिराजने २९ च्या सरासरीने सहा विकेट्स घेतल्या.

शिरूरमध्ये वकिलाचीच केली गेली 1.90 कोटींची फसवणूक; जमीन व्यवहारात घातला गंडा

IBM US Visa : अमेरिकेतील भारतीयांना दणका!'परत जा नोकरी सोडा' IBM ने बंद केली US व्हिसा,Green Card Sponsorship; आता काय होणार?

Ramayana Movie :२७ देशांमध्ये ‘रामायण’चा डंका! रणबीर कपूरच्या चित्रपटाने रचला इतिहास; भारतीय चित्रपटसृष्टीत नवा विक्रम

पदवी नाही, वैद्यकीय नोंदणीही नाही; तरीही रुग्णांवर उपचार सुरू! बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले

Coconut Oil Flooring: नारळाच्या तेलापासून तयार होतंय घराचं फ्लोरिंग! दक्षिण भारतातील अनोखी पद्धत पाहून व्हाल थक्क