रोहित शर्मासाठी सूर्यकुमार यादवची खास पोस्ट
रोहित शर्मा असणार मुंबई इडियन्सचा नवा कर्णधार
आयपीएल 2027 साठी करणार नेतृत्व
Rohit Sharma: काल क्रिकेटविश्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत रोहित शर्माला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच रोहित शर्माचा जवळचा मित्र आणि क्रिकेटर सूर्यकुमार यादवने आपल्या मित्रासाठी सोशल मिडियावर शेअर केली आहे.
मुंबई इंडियन्सने अधिकृतपणे रोहित शर्माची नियुक्ती कर्णधारपदी केली आहे. 2027 च्या हंगामात रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. रोहित शर्माला कर्णधार केल्यावर सूर्यकुमार यादवने देखील पोस्ट शेअर केली आहे. सूर्यकुमार यादव, बुमराह आणि तिलक वर्मा यांच्या नावाची देखील चर्चा कर्णधारपदासाठी सुरू होती.
Rohit Sharma: आला रे आला, मुंबईचा राजा आला! 'हिटमॅन' पुन्हा Mumbai Indians चा कर्णधार
सूर्यकुमार यादवने आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून दिला आहे. आता तो रोहित शर्मासोबत मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. रोहित शर्माच्या नियुक्तीनंतर सूर्यकुमार यादवने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये रोहित शर्माचा फोटो दिसून येत आहे.
सूर्यकुमार यादवने आपल्या पोस्टमध्ये रोहित शर्मासाठी 'लीडर, ब्रदर आणि मार्गदर्शक' अशा विशेषणाचे पोस्ट केली आहे. तसेच 'पलटण कुर्सी की पेटी बांध लो' असे देखील त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. यामधून सूर्यकुमार रोहितच्या नेतृत्वात खेळण्यासाठी उत्साही असल्याचे दिसून येत आहे.
रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला 5 वेळेस आयपीएलचे विजेतेपद जिंकवून दिले आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक यशवी कर्णधार समजला जातो. तसेच 2013 मध्ये चॅम्पियन्स लीग देखील मुंबई इंडियन्सने जिंकली आहे. मागील वर्षी हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यावर चाहत्यांनी तीव्र नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर यावर्षी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचे सर्वेसर्वा आकाश अंबानी यांनी देखील याबाबत पोस्ट शेअर केली आहे. रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. मुंबई इंडियन्सने सोशल मिडियावर पोस्ट करत रोहित शर्माला कर्णधार म्हणून घोषित केले आहे.
मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा कोणाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे?
मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी पुन्हा एकदा रोहित शर्माकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
रोहित शर्मासाठी सोशल मीडियावर कोणी खास पोस्ट शेअर केली आहे?
रोहित शर्माचा जवळचा मित्र आणि भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने त्याच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.