स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध
स्मार्टफोन भारतात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच
एचएमडी राईज स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच डिस्प्ले
HMD Smartphone Launched: टेक कंपनी HMD ने त्यांचा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन HMD Rise या नावाने लाँच करण्यात आला आहे. भारतीय बाजारात लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Indus AI, Sarvam AI असिस्टेंटसह उपलब्ध असणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, Indus AI 22 भारतीय भाषांना सपोर्ट करते.
नवीन एचएमडी स्मार्टफोन भारतात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या या सिंगल व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 2 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन इंडिगो सिल्व्हर, मिडनाईट गोल्ड आणि एमराल्ड गोल्ड कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
नव्या एचएमडी राईज स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा बजेट स्मार्टफोन युनिसॉक 9863A चिपसेटने सुसज्ज आहे. हा ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. एचएमडी स्मार्टफोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे, जो 128 GB पर्यंत मेमोरी कार्डला सपोर्ट करणार आहे.
फोटोग्राफीसाठी एचएमडी बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर दिला आहे. यासोबतच या फोनच्या बॅक पॅनलमध्ये फ्लॅश देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनच्या बॉक्समध्ये चार्जर देखील देण्यात आला आहे.
एचएमडी बजेट स्मार्टफोन राइज अँड्रॉईड 16 गो वर आधारित आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या स्मार्टफोनला दोन वर्षांपर्यंत सिक्योरिटी पॅच अपडेट मिळणार आहे. यासाठी कंपनी प्रत्येक क्वार्टरमध्ये सिक्योरिटी पॅच रिलीज करणार आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 4G, यूएसबी-सी, 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. एचएमडी राईज स्मार्टफोन व्हॉट्सॲप, यूट्यूब, कॉल आणि लाइट ब्राउजिंगसाठी डिझाईन करण्यात आला आहे. या फोनला गेमिंग आणि अवघड कामांसाठी डिझाईन केला आहे.