WhatsApp DP  (सौजन्य- सोशलमीडिया)
गॅजेट

जुन्या WhatsApp DP ला म्हणा बाय-बाय! AI बनवणार तुमचा नवा स्टायलिश लूक

WhatsApp वर वारंवार एकच DP ठेवून कंटाळलेल्या युजर्ससाठी Meta AI ने 'Imagine Me' हे फीचर उपलब्ध करून दिलं आहे. या फीचरच्या मदतीने केवळ तीन सेल्फी अपलोड करून स्वतःचे कार्टून, 3D अवतार किंवा वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटो तयार करता येतात.

Riddhi Vanne
  1. Meta AI च्या मदतीने बनवा हटके WhatsApp DP.

  2. 'Imagine Me' फीचरद्वारे तयार करा AI अवतार.

  3. फक्त 3 सेल्फी देऊन मिळवा नवा स्टायलिश लूक.

WhatsApp DP Tricks: रोज रोज नवा फोटो काढणं कोणाला जमतंय? म्हणूनच बरेच लोक महिनोन महिने एकच DP ठेवतात. पण आता या बोअरिंगपणाला उत्तर मिळालं. मेटा AI च्या मदतीने घरात बसून तुमचा एकदम झक्कास, वेगळ्या स्टाईलमधला DP बनवता येतो. आणि सगळ्यात भारी म्हणजे यात तुमचा खरा चेहरा पण दिसत नाही, त्यामुळे टेन्शनच नाही.

• लोकांनी AI कडे वळायचं कारण काय?

1. फोटो चोरीची भिती - आजकाल आपला खरा फोटो घेऊन त्याचं काहीतरी चुकीचं बनवतील, ही भिती सगळ्यांनाच वाटते. सायबरवाले असले उद्योग करतातच.

2. फोटोशूटचा खर्च आणि वेळ - प्रत्येक वेळी स्टुडिओत जाऊन फोटो काढणं, ते पण शक्य नाही. वेळ पण जातो आणि पैसा पण.

3. मेटाने आणलंय भन्नाट ऑप्शन - म्हणूनच मेटाने भारतीय युजर्ससाठी 'Imagine Me' नावाचं फिचर आणलंय. यात काही सेकंदात तुमचा कार्टून, अवतार किंवा वेगळ्या लूकमधला फोटो तयार होतो.

• Step By Step असा बनवा तुमचा नवा DP

1. आधी 3 सेल्फी द्या - सगळ्यात आधी व्हॉट्सॲपमध्ये Meta AI चॅट ओपन करा आणि "Imagine me..." असं लिहून पाठवा. पहिल्यांदा तो तुमचे 3 फोटो मागेल एक समोरून, एक डाव्या बाजूने आणि एक उजव्या बाजूने. ते स्वच्छ दिसतील असे टाका.

2. आता इंग्रजीत सांगा काय हवंय - फोटो सेट झाले की मग चॅटमध्ये इंग्रजीत लिहा. जसं की, "Imagine me in a cyberpunk style" किंवा "Imagine me as a 3D cartoon avatar", "Imagine me as a 90s rockstar". लक्षात ठेवा, सध्या हे फक्त इंग्रजीतलं बोलणं समजतं.

3. जुन्या फोटोला पण नवा लूक द्या - तुमच्याकडे असलेला कोणताही जुना फोटो तिथेच टाका आणि "Make it a 3D cartoon" असं सांगा, किंवा बॅकग्राउंड बदलायला सांगा. फोटो एकदम नवीन वाटेल.

• यात सेफ्टी काय आहे?

1. चेहरा लपतो - खऱ्या चेहऱ्याचा जवळून काढलेला फोटो न ठेवता AI अवतार ठेवला की फोटो मॉर्फ होण्याचा धोका खूप कमी होतो.

2. AI चा शिक्का असतो - मेटा AI ने बनवलेल्या प्रत्येक फोटोवर 'Imagined with AI' असं लिहिलेलं येतंच. त्यामुळे तो AI ने बनवलाय हे कळतं.

3. हवं तेव्हा फोटो उडवता येतात - तुम्ही दिलेले 3 फोटो तुम्हाला नको असतील तर Meta AI च्या सेटिंगमध्ये जाऊन कधीही डिलीट करू शकता.

• एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा

कोणत्याही फालतू, माहीत नसलेल्या ॲपवर आपले पर्सनल फोटो टाकू नका. फक्त व्हॉट्सॲपचं Meta AI किंवा गुगल जेमिनीसारखं मोठं आणि भरोशाचं ॲप वापरा.

पाण्याची टाकी दाखवण्याच्या बहाण्याने मुलींना गच्चीवर नेऊन छळ; आरोपीला न्यायालयाचा मोठा दणका

माझ्या वाटणीची जमीन मला दे म्हणणे भोवले! १४ वर्षे शिक्षा भोगून सहा महिन्यांपूर्वीच सुटका झाली; मात्र सख्ख्या भावानेच...

IND vs NZ: हॅगली ओव्हलचा रेकॉर्ड टीम इंडियासाठी डोकेदुखी! किवींना रोखलं नाही तर भारत अडचणीत; चौथ्या डावात चमत्कार घडणार?

ITC Block Deal Stake Sale : सोमवारी बाजार उघडताच ITC च्या Share मध्ये होणार मोठी उलथापालथ? परदेशी कंपनीच्या निर्णयाने खळबळ

PM VIKAS Scheme: शिका मोफत, कमवा दरमहा! एकाच सरकारी योजनेतून मिळणार 5 योजनांचे फायदे